वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

 स्वाराती रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग होणार सुपर स्पेशालिटी दर्जाचा!




वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता


नांदेडच्या घटनेनंतर आ. नमिता मुंदडांनी केलेल्या मागणीला यश


अंबाजोगाई - एमबी न्युज वृत्तसेवा

 नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बालकांच्या मृत्युच्या दुर्दैवी घटनेनंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुसज्ज असावे जेणेकरून रुग्णांच्या जीवितास धोका होणार नाही यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाची व्हावीत अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटी प्रमाणे करण्यासाठी (मोड्युलर ओटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातून होणारा जंतुसंसर्ग कमी होऊन रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्याबद्दल केज मतदार संघातील जनता आ. मुंदडा यांचे आभार मानत आहे.


नांदेडच्या स्व. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृहातील जंतू संसर्गामुळे तीस बालकांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस रुग्णालय प्रशासन जबाबदार धरले असले तरी चौकशीअंती त्यासाठी शस्त्रक्रिया गृहातील अस्वच्छतेमुळे झालेला जंतूसंसर्ग कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या घटनेनंतर केजच्या आ. नमिता मुंदडा यांनी आरोग्य विभागाकडे मागणी करत राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाचे व अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सुसज्ज असावेत अशी मागणी लावून धरली होती. या महत्वपूर्ण मागणीची दखल घेत शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी दर्जाच्या शस्त्रक्रिया गृहांना मान्यता दिली आहे. त्यानुसार अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चाला शासनाचे कार्यासन अधिकारी सुधीर शेट्टी यांनी मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयाचे शस्त्रक्रिया गृह उच्च दर्जाचे होणार असल्याने परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, शस्त्रक्रिया गृहाच्या सुसज्जतेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


आरोग्याच्या बाबतीत निधी कमी पडू देणार नाही

जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास्तही शासन स्तरावर विविध उपक्रम सुरु असून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील असून औषधीसह यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी कमी पडू दिला जाणार नाही.

- आ. नमिता अक्षय मुंदडा (आमदार, केज विधानसभा मतदार संघ)


पुणे, मुंबईच्या धर्तीवर हणार अंबाजोगाईत शस्त्रक्रिया

राज्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किचकट शस्त्रक्रियाचे रुग्ण पाठविण्याची वेळ येत होती. परंतु, स्वारातीचे शस्त्रक्रिया गृह उच्च दर्जाच्या यंत्रसामग्रीसह तयार होणार असल्याने जंतुसंसर्ग कमी होऊन दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जन शस्त्रक्रिया यासह इतर शस्त्रक्रिया महानगरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातही करणे शक्य होणार आहे.

-डॉ. भास्कर खैरे (अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !