अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून

 अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून




अंबाजोगाई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ मोंढा रोडवर एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी (दि.०८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. 


राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात राजेंद्र यांचा जागेवर मृत्यू झाला. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून यामागे जागेच्या वादाचे कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !