पोस्ट्स

गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

इमेज
  गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         इंद्रायणी प्रतिष्ठान संचलित जिजामाता विद्यालय धर्मापूरी येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक गुरुदत्त छगनबुवा पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त  निरोप देण्यात आला.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करदादा नागरगोजे,वीणा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिलीपराव गित्ते,महाराष्ट्र भूषण, डॉ.धर्मवीर भारती,माजी प्राचार्य ईश्वर क्षीरसागर,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणअण्णा फड श्री शंकर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एल.गित्ते,नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.चाटे,संत भगवान बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक ढगे,मुख्याध्यापक अविनाश शेटे,गोविंद सोनपिर,हनुमंत कराड,मोहन कांदे, विष्णू भताने, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. गित्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.           गुरुदत्त पुरी यांनी या संस्थेमध्ये ३२ वर्षे प्रदीर्घ सेवा केली.यानिमित्त त्यांचा  सपत्नीक सत्कार करण्यात आला .उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पुरी सर यांच्या कार्याचे कौत

lरोजगार निर्मितीसाठी मोठा उद्योग, कॅन्सर रुग्णांसाठी उपचार सुविधा, मेडिकल काॅलेज

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी अंबाजोगाईत व्यापारी बांधवांसमोर मांडली जिल्हयाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' पालकमंत्री असताना जिल्हयासाठी खूप काम केलं ; लोकनेते मुंडे साहेबांचं विकासाचं अधुरं स्वप्न  पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या अंबाजोगाई ।दिनांक २९। लोकनेते मुंडे साहेबांनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते आपल्यातून अचानक निघून गेले आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पालकमंत्री असतांना जिल्हयात  खूप काम केलं, आता पुन्हा एकदा ती संधी मिळण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग व्हावा, कॅन्सर रूग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, चांगलं मेडिकल काॅलेज व्हावं अशी माझी इच्छा आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंटच व्यापारी बांधवांसमोर सादर केली.    पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंद देशमु

प्रथम वर्षश्राद्ध: विनम्र अभिवादन

इमेज
  कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धा निमित्त ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      येथील कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.             शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. रहाते घर न्यू शिवाजी नगर ता. परळी वैजनाथ, जि.बीड येथे त्यानिमित्त सकाळी १० ते १२ ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन होणार आहे. तरी किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन राजाराम बळीराम शेळके, रोहीत राजाराम शेळके, रोहन राजाराम शेळके यांनी केले आहे.

कचरा वेचणारे हात शिक्षणाचे धडे कधी गिरवतील?

इमेज
  कचरा वेचणारे हात शिक्षणाचे धडे  कधी गिरवतील? प्रत्येक शहरात आणि गावाच्या कोपऱ्याला भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते.कुणीच शिक्षण (Education) घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. घरातील सदस्यांप्रमाणेच इथली लहान मुलं पण कचरा वेचून आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते. अशावेळी काळीज पिळवटून जाते. इथली लहान लहान मुलंही कधी रस्त्यात, सिग्नलवर भीक मागताना दिसून येतात. त्यांच्या पिढ्यापिढ्या शिक्षणाचा संबंध आलेला नाही नाही, अशाच वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्याने त्यांचा शाळेतही प्रवेश होत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच ते कचरा वेचायला जाणं आणि शहरभर फिरून भीक मागून जीवन जगणं हा त्यांचा नित्य नियम, मात्र घरात कोणी शिकलेला नसल्यामुळे शिक्षणाचही महत्व नाही.जे हात कचरा वेचण्यासाठी दिवसभर राबततात, ते हात  पाटी पेन्सिलवर शिक्षणाचे धडे  कधी गिरवतील? शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण झाली आहे. कचरा व्यवस्थापन ही भारतातील मेट्रो श

Loksabha Election Beed:पंकजाताई मुंडेंचा दौरा

इमेज
पंकजाताई मुंडेंचा उद्या माजलगाव दौरा; विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद परळी वैजनाथ, प्रतिनिधी           भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि. 29 रोजी पंकजाताई मुंडे या माजलगाव शहरात असणार आहेत.या दौऱ्यात सिद्धेश्वर दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्या घेणार आहे.त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत.           भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा सुरु आहे.ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या  शुक्र वार, दि. 29 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा माजलगाव दौरा आहे. सकाळी 10.00परळी वैजनाथ येथुन माजलगावकडे रवाना ,सकाळी 11.00आगमन व श्री सिध्देश्वर मंदिर दर्

विनम्र अभिवादन: कै.फुलचंद गित्ते (आबा)

इमेज
एम. कॉम. बीएड शिक्षण घेतल्यानंतरही मातीशी घट्ट नातं ठेवणारे शेतीनिष्ठ 'आबा': कै.फुलचंद गित्ते   का ही व्यक्तिमत्व असे असतात की ते या लोकात नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र सदैव जाग्याच राहतात अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे कै. फुलचंद गित्ते  हे होत. परळी तालुक्यातील मलकापूर या गावातील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय संयमी, मितभाषी, सुस्वभावी असे व्यक्तिमत्व म्हणजे फुलचंद गित्ते होत. कै.फुलचंद गित्ते यांना परळी व पंचक्रोशीत सगळेजण सुस्वभावे म्हणून ओळखत होते. फुलचंद गित्ते यांचे निधन होऊन एक वर्ष कसे लोटले हे कळालेही नाही. आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांच्या स्मृती मात्र सदैव आठवणीतच राहणार आहेत. गित्ते परिवार व त्यांचे स्नेही, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सदैव त्यांच्या स्मृती आठवणीतच राहणार आहेत. Click : ■ मलकापूर येथे कै. फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन             परळी तालुक्यातील मलकापूर येथील एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून फुलचंद कोंडीबा गित्ते यांची ओळख होती. मलकापूर येथे अतिश

परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान

इमेज
  जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक बांधिलकी जोपासून शिवजयंती केली साजरी परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान *छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले-माऊली फड* परळी वैजनाथ/प्रतिनिधी जगाच्या पाठीवर आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी आपल्या राज्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या प्रगती आणि सुरक्षेचा विचार केला आहे. छ.शिवाजी महाराज हे आदर्श राजे असून त्यांच्या सुराज्याचे विचार आजही तेवढेच अनुकलनीय असून राजांच्या सुराज्य धोरणावर जर आपण काम केले तर महाराष्ट्र नेहमीच जनतेचे राज्य म्हणून ओळखले जाईल असे मत विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड यांनी व्यक्त केले. परळी शहरातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील संतश्री रानबा महाराज यांच्या मंदिराचे अपूर्ण काम गुढीपाडव्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला.  वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प

मलकापूर येथे कै.फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन

इमेज
  मलकापूर येथे कै.फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे मलकापूर येथे कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम. कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.     परळी तालुक्यातील मलकापूर येथील महादेव फुलचंद गित्ते (पत्रकार) ,केशव फुलचंद गित्ते, वैभव फुलचंद गित्ते यांचे वडील  कै.फुलचंद कोंडिबा गित्ते (एम.कॉम,बीएड) यांचा वर्षश्राध्दाचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. कष्टाने केली आयुष्याची सुरुवात। सगळयावर फिरवला मायेचा हात । सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ । जन्मो जन्मी पाहु आम्ही तुमची वाट ।। मित्ती माघ फाल्गुन कृ.४ शके १९४५, शुक्रवार, दि.२९/०३/२०२४ रोजी  वारकरी भुषण तथा जगप्रसिद्ध कीर्तनकार श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, श्री क्षेत्र आळंदी यांचे दुपारी १ ते ३ कीर्तन होणार आहे. तसेच  पखवाज सेवक गंभीर महाराज अवचार श

अंबानगरीत लेकीचे उत्स्फूर्त स्वागत: ठिकठिकाणी मतदारांशी आत्मिय संवाद

इमेज
 श्री.योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन: जनता जनार्दनाचे माझ्या पाठिशी सदैव आशिर्वाद - पंकजाताई मुंडे अंबानगरीत लेकीचे उत्स्फूर्त स्वागत: ठिकठिकाणी मतदारांशी आत्मिय संवाद अंबाजोगाई, प्रतिनिधी....            भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. अंबाजोगाईत आज त्यांनी श्री.योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.      श्री.योगेश्वरीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना  पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे भावना व श्रद्धेने नतमस्तक होत असते.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे  व माझी आई नवरात्रात आष्टमीला श्री.योगेश्वरीदेवीच्या दर्शनाला येत असत ही आमच्या परिवाराची परंपरा राहिली आहे. जनसेवेचे बळ मिळावे असे देवीकडे आशिर्वाद मागितले. जनता जनार्दनाचे माझ्या पाठिशी सदैव आशिर्वाद आहेत. लोकांशी संवाद साधत असताना देहबोली मला विजयी आशिर्वाद प्रदान करणारी

मोदी परिवाराकडून पंकजा मुंडेंचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत

इमेज
  मोदी परिवाराकडून पंकजा मुंडेंचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत अंबाजोगाई, प्रतिनिधी......         भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. अंबाजोगाईत आज माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी व परिवाराकडून अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले.           बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचे मोदी परिवाराच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी भेटीदरम्यान कौटुंबिक तसेच लोकसभेच्या दृष्टीने अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Lok Sabha Election: पंकजाताईचा झंझावात

इमेज
  पंकजाताई मुंडे उद्या अंबाजोगाईत; योगेश्वरी देवीचे दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेणार भेटीगाठी  परळी वैजनाथ, प्रतिनिधी            भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि. 28 रोजी पंकजाताई मुंडे या अंबाजोगाई  शहरात असणार आहेत.या दौऱ्यात योगेश्वरी देवीचे दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्या घेणार आहेत.           भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या  गुरुवार, दि. 28 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा अंबाजोगाई शहरातील दौरा आहे.सकाळी 11.00 परळी वैजनाथ येथुन अंबाजोगाई कडे रवाना,सकाळी 11.30 आगमन व श्री योगेश्वरी देवीचे दर्शन,दुपारी 12 ते 3.30 अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी,सायं

Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी

इमेज
  Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी- पंतप्रधान मोदी, अमित शाह, शिंदे,पवार, फडणवीस,पंकजा मुंडे यांच्यासह ४० नावं भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. हे सगळेच स्टार प्रचारक ४०० पारसाठी प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार ४०० पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशात भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. पण जाणून घेऊ भाजपाचे स्टार प्रचारक कोण कोण आहेत? भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण? १) नरेंद्र मोदी २) जे.पी. नड्डा ३) राजनाथ सिंह ४) अमित शाह<br>५) नितीन गडकरी ६) योगी आदित्यनाथ ७) प्रमोद सावंत ८) भुपेंद्र पटेल ९) विष्णू देव साई १०) डॉ. मोहन यादव ११) भजनलाल शर्मा १२) रामदास आठवले १३) नारायण राणे १४) अनुराग ठाकूर १५) ज्योतिरादित्य सिंधिया १६) स्

विकास अन् विश्वास हाच प्रचाराचा मुद्दा

इमेज
  पंकजाताई मुंडे यांचा केजमध्ये झंझावात ; ठिक ठिकाणी झालं जल्लोषात स्वागत ! मी केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमावलेला विश्वास हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा जातीपातीच राजकारण कधीच केलं नाही ; बुध्दीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा केज ।दिनांक २७। पालकमंत्रीपदाच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती आजही मला मिळते आहे. विकास करताना मी कधीच भेदभाव केला नाही. जात पाहिली नाही, बुथ प्लस आहे का मायनस हे देखील कधी बघितलं नाही.मी जिल्ह्याचा केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमवलेला विश्वास हाच या निवडणूकीत माझा प्रचाराचा मुद्दा असेल, त्यामुळं बुद्‌धीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन भाजपच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.       पंकजाताई मुंडे आज केजच्या दौर्‍यावर असून मतदारसंघांतील बुथ कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आजच्या झंझावाती दौऱ्यात पंकजाताईंचं शहरात ठिक ठिकाणी मोठया जल्लोषात स्वागत झालं. आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, संतोष हंगे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, विजयकांत मुंडे, वासुदेव नेहरकर, सुनील ग

बीडमध्ये भाजपाला धक्का: ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश

इमेज
  बीडमध्ये भाजपाला धक्का: ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश परळी वैजनाथ, वृत्तसेवा...         भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर अनेक वर्ष काम केलेले भगवान सेनेचे सरसेनापती यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फुलचंद कराड यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजपा नेत्यांने शरद पवार गटात प्रवेश केल्याने हा बीड भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.       दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत निकटचे सहकारी म्हणून अनेक वर्ष फुलचंद कराड यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केलेले आहे. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व संचालक म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून  विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यानंतर परत ते भाजपात आले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष

ज्योती मेटे मैदानात

इमेज
  ज्योती विनायक मेटे मैदानात ! अपक्ष की महाविकास आघाडी, निर्णय दोन दिवसात  बीड- शिवसंग्रामच्या प्रमुख तथा स्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट बीड लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा पक्का केला आहे.येत्या दोन दिवसात अपक्ष लढायचं की महाविकास आघाडीकडून हे निश्चित केले जाईल अशी माहिती मेटे यांनी दिली. ज्योती मेटे यांनी मंगळवारी स्व विनायक मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी

पंकजाताई मुंडे यांचा उद्या केज मतदार संघात झंजावात !

इमेज
  पंकजाताई मुंडे यांचा उद्या केज मतदार संघात झंजावात !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी            भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दिनांक 27 रोजी पंकजाताई मुंडे या केज मतदार संघाचा दौरा करणार आहेत. विविध कार्यक्रमांना उपस्थिती, धार्मिक स्थळांचे दर्शन, नागरिकांच्या भेटीगाठी व जनतेच्या स्वागताचा स्वीकार असा हा दौरा असणार आहे.        भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या   बुधवार, दि. 27 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा केज विधानसभा मतदारसंघ दौरा आहे. सकाळी 9.00 परळी वैजनाथहुन केजकडे रवाना ,सकाळी 10.00 केज येथे आगमन,सकाळी 10.10 श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन,सकाळी 11.10 डॉ. अशोक थोरात यांचेकडे भेट,सकाळी 11.45 केजहुन औरंगपूर कडे रवाना,

परळीच्या सुपुत्राने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक मध्ये मिळवले सुवर्णपदक

इमेज
  परळीच्या सुपुत्राने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक मध्ये मिळवले सुवर्णपदक जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चि.सूर्या सचिन सौंदळे यास सूवर्णपदक तर कु.सानवी सौंदळे सह सब ज्युनिअर संघास सुवर्णपदक प्राप्त परळी वैजनाथ....   पंचम ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने जम्मू-कश्मीर येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट (9ते11वर्षे) वैयक्तिक गटातून सुवर्णपदक व त्याशिवाय मिश्र तिहिरी चे रौप्य पदक पटकावले तर त्याचीच ज्येष्ठ भगिणी कु.सानवी सौंदळे हीने सब ज्युनिअर गटात यश मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.   चि.सूर्या व कु.सानवी सख्खे भाऊ-बहीण यांच्या दैदीप्यमान यशामुळे आपल्या परळी शहराचेच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा,मराठवाडा प्रदेश व महाराष्ट्र राज्याचे नांव उज्जवल केले आहे.    सूर्या-सानवी परळी-वैजनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समुपदेशक जी.एस.सौंदळे (गुरूजी) यांची नातू-नात असून,राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचे पुतणे आहेत.    राष्ट्रीय एरोबिक ज

Motivational Story:मानवतेचे ज्वलंत उदाहरण: डॉ.अनिल बर्वे

इमेज
  मानवतेचे ज्वलंत उदाहरण: डॉ.अनिल बर्वे  वैद्यकीय क्षेत्र हे पूर्वीपासूनच आकर्षणाचे व सामाजिक बांधिलकीचे क्षेत्र राहिलेले आहे या व्यवसायाला बांधिलकी जपणारे डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे गेल्या बारा वर्षापासून गोरगरीब व अडलेल्या व नडलेल्या रुग्णांची सेवा करत आहेत. 25 मार्च 1985 रोजी शिवाजीराव व कमलबाई यांच्या पोटी जन्मास आलेले सुपुत्र नरळद मुळगाव असलेले डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे खरोखरच आजच्या समाजापुढे एक आदर्श डॉक्टर म्हणून सुपरिचित आहेत. गेल्या बारा वर्षापासून डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे गंगाखेडच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत असतात त्याचबरोबर डॉक्टर लेन मधील त्यांचे संजीवनी हॉस्पिटल सुद्धा कधीही कोणासाठीही उघडे असते. डॉक्टर अनिल बर्वे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण नरळद या पुण्यभूमीत झाले व माध्यमिक शिक्षण जनाबाईच्या पवित्र नगरीच्या शेजारी असलेल्या मर्डसगाव मध्ये घेऊन उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी अहमदपूर या ठिकाणी जाऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्ण करून आपल्या कार्यास सुरुवात केलेली आहे. डॉक्ट

Beed Job Fair 2024 : सुवर्णसंधी...लाभ घ्या

इमेज
  12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 350 रिक्त जागांसाठी बीड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन  बीड |  बीड येथे  प्रशिक्षणार्थी  पदांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (Beed Job Fair 2024) आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी व खालील संबंधित पत्त्यावर मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख  26 मार्च 2024  आहे. Beed Job Fair • पदाचे नाव  –  प्रशिक्षणार्थी • पद संख्या  –  350 + • शैक्षणिक पात्रता  – HSC  ( Read Complete Details). • पात्रता  – खाजगी नियोक्ता • अर्ज पध्दती  – ऑनलाईन (नोंदणी) • राज्य –  महाराष्ट्र • जिल्हा  – नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बिड, लातूर, धाराशिव • मेळाव्याची तारीख -26 मार्च 2024 • रोजगार मेळाव्याचा पत्ता – interview on online telecallin जाहीरात:👇👇👇 https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

Motivational Story: मराठी माध्यम ते एमबीबीएस प्रतीक मुसळेचा प्रेरणादायी प्रवास

इमेज
  मराठी माध्यम ते एमबीबीएस प्रतीक मुसळेचा प्रेरणादायी प्रवास  परळी प्रतिनिधी.... -येलदरी अहमदपूर मुळगाव असलेला प्रतीक्, जन्म 25 मार्च 2002 रोजी झाला व इतरा प्रमाणेच आपले नशीब आज मावण्यासाठी जनाबाईच्या पवित्र नगरीत गंगाखेड येथील प्राथमिक शिक्षण करण्यासाठी प्रतीकचा प्रवास आपले वडील सुधाकर मुसळे व उषाताई मुसळे मॅडम यांच्यासोबत सुरू झाला. उषाताई मॅडम व सुधाकरराव मुसळे यांच्या     मेहनतीला व शिस्तप्रिय मार्गदर्शनाला प्रतीक मुसळे यांनी योग्य प्रतिसाद देऊन प्रयत्नाचे चीज केले. मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये उच्च ध्येय साध्य करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण प्रतीक मुसळे यांनी येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेले आहे. प्रतिक वाढदिवसानिमित्त विशेष गोष्ट अशी आहे की आजच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले आहेत , आणि पालकांचा ओढा हा विनाकारण इंग्रजी माध्यमाकडे जात आहे या निमित्ताने एवढेच आपण म्हणू शकतो की मराठी माध्यमात सुद्धा जर मेहनत केली तर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो हे उदाहरण प्रतीक मुसळे यांच्या उदाहरणातून आपण घेऊ शकतो. प्रतीक मुसळे

गोपीनाथ गडावर लोकनेत्याच्या चरणी नतमस्तक

इमेज
  गोपीनाथ गड ते यशःश्री ; पंकजाताई मुंडेंचं जन्मभूमीत अभूतपूर्व स्वागत गोपीनाथ गडावर लोकनेत्याच्या चरणी नतमस्तक पांगरी, परळीत स्वागताचा  जल्लोष ; ठिकठिकाणी महिलांनी केलं औक्षण; कार्यकर्त्यांत उत्साह संचारला परळी वैजनाथ।दिनांक २४। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांचं आज जन्मभूमीत जल्लोषपूर्ण आणि अभूतपूर्व असं स्वागत झालं. स्वागतापूर्वी त्यांनी गोपीनाथ गडावर आपले पिता आणि नेता लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पांगरी व परळीत कार्यकर्त्यांनी  वाजतगाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं जोरदार स्वागत केलं.     बीडहून दुपारी पंकजाताई मुंडे हया थेट गोपीनाथ गडावर आल्या. याठिकाणी त्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. दर्शनानंतर पांगरी येथील चौकात त्यांचं ढोल ताशांच्या निनादात वाजतगाजत, जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी बाहेरून खास बॅन्ड पथक मागविण्यात आले होते. शहरात ठिक ठिकाणी औक्षण ; स्वागताचा जल्लोष ------ पंकजाताई मुंड

माझ्यासाठी भावनिक क्षण - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडे,पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी घेतले गोपीनाथ गडाचे आशिर्वाद  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        भाजपच्या बीड मतदारसंघाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात अभिवादन केलं. गोपीनाथ मुंडे यांचे आशिर्वाद घेतले.  भाजपच्या नेत्या, बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, भाजप नेत्या प्रितम मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते. पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले.प्रितम, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री ,विद्यमान खासदार माझ्या स्वागताला...मी तगडी उमेदवार-पंकजाताई मुंडे      लोकसभेची मी उमेदवार आहे. त्यामुळे मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवलं होतं की, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्

● लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त !

इमेज
  ● लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त ! पंकजाताईंची अशीही संवेदनशीलता: 'त्या' युवकांवर गुन्हे नको -पोलीस अधीक्षकांना दिले पत्र  बीड, प्रतिनिधी....           पंकजाताई मुंडे यांच्या प्रगल्भ व सुसंस्कृत राजकारणाचा संपूर्ण बीड जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाही परिचय आहे. अनेक प्रसंगांमध्ये आपल्या जबाबदारीचे भान ठेवत अतिशय संवेदनशीलपणाची भूमिका त्या नेहमीच घेताना दिसतात. असाच एक प्रसंग काल बीड जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. आपल्याच जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या व नोकरी योग्य असणाऱ्या युवकांचे भविष्य कायदेशीर अडचणीत अडकू नये यासाठी त्यांनी या युवकांवर गुन्हे नको अशी भूमिका घेतली आहे.          बीड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून पंकजाताई मुंडे या दौऱ्यात असताना साक्षाळपिंपरी या गावात जात असताना त्यांच्या गाडीला घोषणाबाजी करत काही युवकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार  पुढे आला होता. सध्या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू असून जमावबंदी आदेशही लागू आहे. या अनुषंगाने या प

देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

इमेज
  देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव परळी / प्रतिनिधी  देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल,  असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन 21 गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दवस विविध उपक्रमाने संपन्न झाला. सकाळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही सहभागी झाली होती.  ●●●●●●●●●●●●● *सुविधा वाढल्या,समाधान हरवले - डाॅ. हमीद दाभोळकर* जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा वाढल्या आहेत. सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस समाधानी झाला नाही उलट तो अधिक तणावात गेला आहे. विशेषतः 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिडताना दिसत आहे. त्यातून आपल्या देशात वर्षाल

यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड

इमेज
  ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय-प्रदिप खाडे   यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड   विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष द्यावे- सपोनि खोडेवाड विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण घेत विद्यार्थी उच्च पातळीवर पोंहचत आहेत यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले असुन भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करु असे प्रतिपादन कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले. स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित हजारो रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.    कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई