इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी

 Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी- पंतप्रधान मोदी, अमित शाह, शिंदे,पवार, फडणवीस,पंकजा मुंडे यांच्यासह ४० नावं


भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. हे सगळेच स्टार प्रचारक ४०० पारसाठी प्रचार करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार ४०० पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशात भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. पण जाणून घेऊ भाजपाचे स्टार प्रचारक कोण कोण आहेत?

भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण?

१) नरेंद्र मोदी
२) जे.पी. नड्डा
३) राजनाथ सिंह
४) अमित शाह<br>५) नितीन गडकरी
६) योगी आदित्यनाथ
७) प्रमोद सावंत
८) भुपेंद्र पटेल
९) विष्णू देव साई
१०) डॉ. मोहन यादव
११) भजनलाल शर्मा
१२) रामदास आठवले
१३) नारायण राणे
१४) अनुराग ठाकूर
१५) ज्योतिरादित्य सिंधिया
१६) स्मृती इराणी
१७) शिवराज चौहान
१८) के. अण्णमलई
१९) रवि किशन
२०) मनोज तिवारी
ही नावं आहेत. तर महाराष्ट्रातल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांसह अशोक चव्हाण, अजित पवार, गिरीश महाजन यांचीही नावं आहेत.

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

१) एकनाथ शिंदे
२) अजित पवार
३) देवेंद्र फडणवीस
४) रावसाहेब दानवे
५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार
११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!