परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान

 जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक बांधिलकी जोपासून शिवजयंती केली साजरी




परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान


*छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले-माऊली फड*


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

जगाच्या पाठीवर आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी आपल्या राज्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या प्रगती आणि सुरक्षेचा विचार केला आहे. छ.शिवाजी महाराज हे आदर्श राजे असून त्यांच्या सुराज्याचे विचार आजही तेवढेच अनुकलनीय असून राजांच्या सुराज्य धोरणावर जर आपण काम केले तर महाराष्ट्र नेहमीच जनतेचे राज्य म्हणून ओळखले जाईल असे मत विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड यांनी व्यक्त केले. परळी शहरातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील संतश्री रानबा महाराज यांच्या मंदिराचे अपूर्ण काम गुढीपाडव्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला.  वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले. दरम्यान जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या या सामाजिक कार्याचे परळी शहरातील नागरिक, व्यापारी बांधवांनी कौतुक केले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज गुरूवार दिनांक 28 मार्च रोजी परळी येथे जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोंढा मैदानावर साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आई तुळजाभवानी, जिजाऊ माँसाहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन परळी विविध व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. तर परळी शहरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादक महादेयांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. 


 जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक परळी वैद्यनाथ  नगरीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार(पप्पु )ठक्कर यांचा मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव समितीच्या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, दै.परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, दै.जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने पाटील, दै.दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर, पत्रकार संतोष जुजगर, अनंत कुलकर्णी, व्यापारी गुलाब अप्पाराव शेटे, बंडू गरूड, ब्रिजलालजी मुंदडा, विष्णुदासजी बियाणी, फडकरी अप्पा, सुरेश ठक्कर, ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे, वृद्ध कलावंत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास काटे,यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे वातावरण अधिक भगवेमय व उत्साहवर्धक झालेले होते. कार्यक्रमाचे संचलन जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे प्राचार्य अतुल दुबे तर आभार प्रदर्शन श्रीनिवास उर्फ मुन्ना सावजी यांनी केले. याच कार्यक्रमात  परळी शहररातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील असलेले संतश्री रानबा महाराज यांचे मंदिर असून या मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम गुढीपाडव्यापर्यंत पुर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात ध्येय मंत्र  व प्रेरणामंत्राने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास शहर व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे,श्रीनिवास सावजी, रमेशअण्णा चौंडे, सोमाने , प्रकाश देवकर, सचिन मुंडे, दिनेश लोंढे,माऊली मुंडे, नवनाथ वरवटकर, किशन बुंदिले ,संस्कार पालीमकर, योगेश जाधव मनीष जोशी,अमित कचरे, दीपक जोशी, अजय आघाव,गोपीनाथ मुंडे, ईश्वर गायके,नवल वर्मा सिद्धार्थ गायकवाड शिवम मोहिते, वरद कुलकर्णी  लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, अनिल घोबाळे,योगेश जाधव, जगदीश पवार, नरेश मैड, सोमनाथ गायकवाड, अभिजित पवार,करण कुसळे, विनित वानरे, रवी देवकर, मोहित जोशी, बालाजी सातपुते, हनुमान जाधव, नागनाथ तूपसौंदर, कैलास तूपसौंदर, जालिंदर फड यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार