इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

ज्योती मेटे मैदानात

 ज्योती विनायक मेटे मैदानात !



अपक्ष की महाविकास आघाडी, निर्णय दोन दिवसात 

बीड- शिवसंग्रामच्या प्रमुख तथा स्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट बीड लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा पक्का केला आहे.येत्या दोन दिवसात अपक्ष लढायचं की महाविकास आघाडीकडून हे निश्चित केले जाईल अशी माहिती मेटे यांनी दिली.

ज्योती मेटे यांनी मंगळवारी स्व विनायक मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, असे असतानाच ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या