माझ्यासाठी भावनिक क्षण - धनंजय मुंडे

 धनंजय मुंडे,पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी घेतले गोपीनाथ गडाचे आशिर्वाद 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....


       भाजपच्या बीड मतदारसंघाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात अभिवादन केलं. गोपीनाथ मुंडे यांचे आशिर्वाद घेतले. 


भाजपच्या नेत्या, बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, भाजप नेत्या प्रितम मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते. पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले.प्रितम, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


पालकमंत्री ,विद्यमान खासदार माझ्या स्वागताला...मी तगडी उमेदवार-पंकजाताई मुंडे

     लोकसभेची मी उमेदवार आहे. त्यामुळे मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवलं होतं की, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्वाद घ्यावेत. पण धनंजय यांनी सांगितलं की तेच गोपीनाथ गडावर येत आहेत, असं पंकजा म्हणाल्या.मी इथं माझ्या भावाला भेटले पण घरी जाऊन जिल्हाच्या पालकमंत्र्यांना मी भेटेन. त्यांच्याशी चर्चा करेन. आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रतिम मुंडे आल्या आहेत. विचार करा मी किती तगडी उमेदवार आहे असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.


*माझ्यासाठी भावनिक क्षण - धनंजय मुंडे...*

     आम्ही तिघं गोपीनाथ गडावर आलो आहोत, ही माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच त्यांचं स्वागत करणार होतो. पण त्या म्हणाल्या की, तू पालकमंत्री आहेस, तर तू घरी थांब मी भेटायला येते. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे. तिचं स्वागत करायला मी इथं असणं हे माझं काम आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार