मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

Loksabha Election Beed:पंकजाताई मुंडेंचा दौरा

पंकजाताई मुंडेंचा उद्या माजलगाव दौरा;विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद



परळी वैजनाथ, प्रतिनिधी
          भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि. 29 रोजी पंकजाताई मुंडे या माजलगाव शहरात असणार आहेत.या दौऱ्यात सिद्धेश्वर दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्या घेणार आहे.त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत.
          भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा सुरु आहे.ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या  शुक्रवार, दि. 29 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा माजलगाव दौरा आहे. सकाळी 10.00परळी वैजनाथ येथुन माजलगावकडे रवाना ,सकाळी 11.00आगमन व श्री सिध्देश्वर मंदिर दर्शन स्थळ - झेंडा चौक, माजलगाव,सकाळी 11.20 आ. प्रकाशदादा सोळंके यांचेकडे भेट,सकाळी 11.40  नितीन नाईकनवरे यांचेकडे भेट,सकाळी 12.00 मोहनराव जगताप यांचेकडे भेट, दुपारी 12.20 मोहनराव सोळंके (माजी आमदार) यांचेकडे भेट,दुपारी 12.35 रमेशराव आडसकर यांचेकडे भेट,दुपारी 12.45 भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद स्थळ - व्यंकटेश हॉटेल (हॉल) बजाज कॉम्प्लेक्स, बीड रोड, माजलगाव,दुपारी 02.00 डी.के. देशमुख (माजी आमदार) यांचेकडे भेट,दुपारी 02.20 तुकाराम बापु येवले (ता. प्रमुख शिवसेना) यांचेकडे भेट,दुपारी 02.30 ते 4.45 पर्यंत माजलगाव शहरातील डॉक्टर्स, वकील, व्यापारी व विविध सामाजिक संघटनेच्या गाठीभेटी ,सायं 05.00 माजलगाव येथुन परळी वै कडे प्रयाण असा दौरा कार्यक्रम आहे.
         या दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांच्या समवेत भाजपचे लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, महायुतीची नेतेमंडळी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....