परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

विकास अन् विश्वास हाच प्रचाराचा मुद्दा

 पंकजाताई मुंडे यांचा केजमध्ये झंझावात ; ठिक ठिकाणी झालं जल्लोषात स्वागत !




मी केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमावलेला विश्वास हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा


जातीपातीच राजकारण कधीच केलं नाही ; बुध्दीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा


केज ।दिनांक २७।

पालकमंत्रीपदाच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती आजही मला मिळते आहे. विकास करताना मी कधीच भेदभाव केला नाही. जात पाहिली नाही, बुथ प्लस आहे का मायनस हे देखील कधी बघितलं नाही.मी जिल्ह्याचा केलेला अभूतपूर्व विकास आणि तुमचा कमवलेला विश्वास हाच या निवडणूकीत माझा प्रचाराचा मुद्दा असेल, त्यामुळं बुद्‌धीभेद करणाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन भाजपच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

 

    पंकजाताई मुंडे आज केजच्या दौर्‍यावर असून मतदारसंघांतील बुथ कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आजच्या झंझावाती दौऱ्यात पंकजाताईंचं शहरात ठिक ठिकाणी मोठया जल्लोषात स्वागत झालं. आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, संतोष हंगे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, विजयकांत मुंडे, वासुदेव नेहरकर, सुनील गलांडे आदी यावेळी उपस्थित होते. धारूर चौकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांनी जोरदार स्वागत केले. स्वागताला सभेचं स्वरूप आले.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या काळात सर्व जातीधर्माची मोट बांधली होती. आता त्यावेळेस सारखं परकीय आक्रमण नाही पण आज बुध्दीभेद करणाऱ्यांपासून आपल्याला सावध रहायचं आहे. 

तुमचं विश्व तुमच्या बुथ एवढं तालुक्याएवढं, काहीही झालं तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही.स्वतःवर दिलेली जबाबदारी सोडून दुसर्‍या ठिकाणी काय चाललयं याकडे लक्ष द्यायचं नाही.मिडीयाने फक्त विरोधातल्या बातम्या लावू नयेत, हे समर्थन पण दाखवावं असं त्या म्हणाल्या.


जातीपातीच राजकारण कधीच केलं नाही

-------

पालकमंत्री पदाच्या काळात जिल्हयात जी विकासाची कामे केली, त्याची आठवण लोकं आजही गावागावात गेल्यावर काढतात. ताई, तुम्ही हा रस्ता दिला, हे आरोग्य केंद्र दिलं, ही शाळा दिली. अशा कितीतरी कामं लोकं स्वतःहून सांगतात. विकास करताना मी जात-पात पाहिली नाही, बुथ प्लस की मायनस हे सुध्दा कधी बघितलं नाही असं पंकजाताई म्हणाल्या.


विकास अन् विश्वास हाच प्रचाराचा मुद्दा 

------

मी शिवशक्ती परिक्रमा करून आलेय, माझी शक्ती तुम्हीच अन् भक्ती देखील तुमच्यावरच आहे.

मी जिल्ह्याचा केलेला अभूतपूर्व विकास अन् तुमचा कमवलेला विश्वास हाच या निवडणूकीत माझा प्रचाराचा मुद्दा आहे. मला दाखवलेल्या काळ्या झेंड्याबद्दल माझा आक्षेप नाही, हे मनोज जरांगेच्या आंदोलनातील संबंधित नाहीत अस मला वाटतं. आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती करायचीय.मला आशिर्वाद द्या, तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.मी केलेला विकासचं मला संसदेत घेऊन जाईल, अन यावेळी आपली कहाणी अधुरी राहणार नाही. यावेळी मी दिल्लीवरून सत्कारासाठी येईल तेव्हा मुंडे साहेबांच्या सत्काराची अधुरी कहाणी देखील आपल्याला पूर्ण करायची आहे. आपल्या स्वभावामुळे, चारित्र्यामुळे, वागण्यामुळे आणि आपल्या कामामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


स्वामी समर्थ, संत तुकाराम महाराजांचे घेतले आशीर्वाद

------

पंकजाताई मुंडे यांनी सकाळी केज शहरात आल्यावर स्वामी समर्थ मठात जाऊन समर्थांचे दर्शन घेतले. संत तुकाराम बीज निमित्त पावनधाम येथे आयोजित सप्ताहात उपस्थित राहून तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेतले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!