गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        इंद्रायणी प्रतिष्ठान संचलित जिजामाता विद्यालय धर्मापूरी येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक गुरुदत्त छगनबुवा पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त  निरोप देण्यात आला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करदादा नागरगोजे,वीणा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिलीपराव गित्ते,महाराष्ट्र भूषण, डॉ.धर्मवीर भारती,माजी प्राचार्य ईश्वर क्षीरसागर,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणअण्णा फड श्री शंकर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एल.गित्ते,नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.चाटे,संत भगवान बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक ढगे,मुख्याध्यापक अविनाश शेटे,गोविंद सोनपिर,हनुमंत कराड,मोहन कांदे, विष्णू भताने, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. गित्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

          गुरुदत्त पुरी यांनी या संस्थेमध्ये ३२ वर्षे प्रदीर्घ सेवा केली.यानिमित्त त्यांचा  सपत्नीक सत्कार करण्यात आला .उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पुरी सर यांच्या कार्याचे कौतुक केले.गुरुदत्त पुरी यांनी प्रामाणिक पणे सेवा बजावली,त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन डॉ. भारती यांनी केले सत्काराला उत्तर देताना पुरी सरांनी सर्व सहकारी व नातेवाईकांचे आभार मानले. विद्यार्थी हे आपले दैवत असून यापुढेही निजी जीवनात आपण ज्ञानदान करण्यात अग्रेसर राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रास्ताविक प्राचार्य गित्ते यांनी तर सूत्रसंचालन एम के मुंडे,आर बी फड यांनी केले. यावेळी संस्थे अंतर्गत असलेल्या विविध शाळांच्या वतीने तसेच परिसरातील विविध शाळा, मुख्याध्यापक,  शिक्षक वृंद नातेवाईक,आप्तेष्ट,स्नेही, व विद्यार्थ्याच्या वतीने पुरी सरांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !