पंकजाताई मुंडे यांचा उद्या केज मतदार संघात झंजावात !

 पंकजाताई मुंडे यांचा उद्या केज मतदार संघात झंजावात !



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

          भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दिनांक 27 रोजी पंकजाताई मुंडे या केज मतदार संघाचा दौरा करणार आहेत. विविध कार्यक्रमांना उपस्थिती, धार्मिक स्थळांचे दर्शन, नागरिकांच्या भेटीगाठी व जनतेच्या स्वागताचा स्वीकार असा हा दौरा असणार आहे.

       भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या 

 बुधवार, दि. 27 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा केज विधानसभा मतदारसंघ दौरा आहे. सकाळी 9.00 परळी वैजनाथहुन केजकडे रवाना ,सकाळी 10.00 केज येथे आगमन,सकाळी 10.10 श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन,सकाळी 11.10 डॉ. अशोक थोरात यांचेकडे भेट,सकाळी 11.45 केजहुन औरंगपूर कडे रवाना, दुपारी 12.10 औरंगपूर येथे आगमन - प्रति देहु श्रीक्षेत्र पावनधाम अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी 12.45 औरंगपूरहुन केजकडे रवाना,दुपारी 01.00 केज येथे आगमन - स्वागत पॉईंट स्थळ - जयभवानी चौक / धारुर चौक,दुपारी 01.15 केज विधानसभा मतदारसंघ बैठक स्थळ - वसुधंरा शाळा, केज,दुपारी 03.00 केज शहरात विविध ठिकाणी भेटी ,सायं 06.00 केजहून होळकडे रवाना,सायं 06.20 होळ येथे आगमन व श्री नेताजी शिंदे यांचेकडे भेट,संध्या 6.45 होळहून परळीकडे रवाना,रात्रौ 08.00 परळी येथे आगमन व राखीव असा दौरा कार्यक्रम आहे.

      या दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांच्या समवेत केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, केज भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !