परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मानवतेचे ज्वलंत उदाहरण: डॉ.अनिल बर्वे
वैद्यकीय क्षेत्र हे पूर्वीपासूनच आकर्षणाचे व सामाजिक बांधिलकीचे क्षेत्र राहिलेले आहे या व्यवसायाला बांधिलकी जपणारे डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे गेल्या बारा वर्षापासून गोरगरीब व अडलेल्या व नडलेल्या रुग्णांची सेवा करत आहेत. 25 मार्च 1985 रोजी शिवाजीराव व कमलबाई यांच्या पोटी जन्मास आलेले सुपुत्र नरळद मुळगाव असलेले डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे खरोखरच आजच्या समाजापुढे एक आदर्श डॉक्टर म्हणून सुपरिचित आहेत. गेल्या बारा वर्षापासून डॉक्टर अनिल बर्वे साहेब हे गंगाखेडच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत असतात त्याचबरोबर डॉक्टर लेन मधील त्यांचे संजीवनी हॉस्पिटल सुद्धा कधीही कोणासाठीही उघडे असते.
डॉक्टर अनिल बर्वे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण नरळद या पुण्यभूमीत झाले व माध्यमिक शिक्षण जनाबाईच्या पवित्र नगरीच्या शेजारी असलेल्या मर्डसगाव मध्ये घेऊन उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी अहमदपूर या ठिकाणी जाऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्ण करून आपल्या कार्यास सुरुवात केलेली आहे.
डॉक्टर बर्वे साहेब यांचा सर्वांशी मिळताजुळता स्वभाव व माणुसकीची जाण या गोष्टीमुळे ते लोकप्रिय आहेत.
डॉक्टर अनिल बर्वे साहेब यांचे वडील हे प्राथमिक केंद्रप्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी आपल्या मुलाला जे संस्कार दिले त्यातच त्यांचे यश दिसून येते. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या चहा त्यांची दवाखान्याकडे रिघ लागली होती. त्यातून त्यांचा अत्यंत साधेपणा व आपल्या सेवे विषयी तळमळ दिसून येत होती.
डॉक्टर अनिल बर्वे साहेब यांची वैद्यकीय सेवा अशीच चालू राहावी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभ घ्यावे अशी श्री संत जनाबाईचे चरणी प्रार्थना !!!
✍️✍️ प्रा. लक्ष्मण रामकिशन गरड,
मॉडर्न कॉलेज परळी वैजनाथ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा