● लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त !

 ● लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त !


पंकजाताईंची अशीही संवेदनशीलता: 'त्या' युवकांवर गुन्हे नको -पोलीस अधीक्षकांना दिले पत्र


 बीड, प्रतिनिधी....

          पंकजाताई मुंडे यांच्या प्रगल्भ व सुसंस्कृत राजकारणाचा संपूर्ण बीड जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाही परिचय आहे. अनेक प्रसंगांमध्ये आपल्या जबाबदारीचे भान ठेवत अतिशय संवेदनशीलपणाची भूमिका त्या नेहमीच घेताना दिसतात. असाच एक प्रसंग काल बीड जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. आपल्याच जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या व नोकरी योग्य असणाऱ्या युवकांचे भविष्य कायदेशीर अडचणीत अडकू नये यासाठी त्यांनी या युवकांवर गुन्हे नको अशी भूमिका घेतली आहे.

         बीड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून पंकजाताई मुंडे या दौऱ्यात असताना साक्षाळपिंपरी या गावात जात असताना त्यांच्या गाडीला घोषणाबाजी करत काही युवकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार  पुढे आला होता. सध्या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू असून जमावबंदी आदेशही लागू आहे. या अनुषंगाने या प्रचार दौऱ्यानिमित्त एक मराठा लाख मराठा व मराठा आरक्षणाच्या संदर्भाने घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांवर पोलीस गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याची माहिती पंकजाताई मुंडे यांना कळाली. यावर अतिशय संवेदनशीलपणे विचार करत पंकजाताई मुंडे यांनी या युवकांनी कुठलीही वित्तहानी, जीवितहानी अथवा हानी पोहोचविण्यासारखे कोणतेही कृत्य केले नसल्याने तसेच ही मुले शिक्षण घेणारी किंवा नोकरी योग्य असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत अशा प्रकारचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. जिल्ह्याचे जबाबदार नेतृत्व म्हणून नेहमीच पंकजाताई मुंडे यांनी सामंजस्य व जबाबदारीची भूमिका घेतल्याचे अनेक वेळा दिसून येते. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या पालक या नात्याने त्यांनी या युवकांच्या या कृतीचाही आपलीच लेकरे म्हणून विचार केला व त्यांचे भविष्य कायद्याच्या कारवाईत अडकून पडू नये यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत अशा प्रकारची मागणी एका पत्राद्वारे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार