अंबानगरीत लेकीचे उत्स्फूर्त स्वागत: ठिकठिकाणी मतदारांशी आत्मिय संवाद

 श्री.योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन: जनता जनार्दनाचे माझ्या पाठिशी सदैव आशिर्वाद - पंकजाताई मुंडे




अंबानगरीत लेकीचे उत्स्फूर्त स्वागत: ठिकठिकाणी मतदारांशी आत्मिय संवाद


अंबाजोगाई, प्रतिनिधी....

           भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. अंबाजोगाईत आज त्यांनी श्री.योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

     श्री.योगेश्वरीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना  पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे भावना व श्रद्धेने नतमस्तक होत असते.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे  व माझी आई नवरात्रात आष्टमीला श्री.योगेश्वरीदेवीच्या दर्शनाला येत असत ही आमच्या परिवाराची परंपरा राहिली आहे. जनसेवेचे बळ मिळावे असे देवीकडे आशिर्वाद मागितले. जनता जनार्दनाचे माझ्या पाठिशी सदैव आशिर्वाद आहेत. लोकांशी संवाद साधत असताना देहबोली मला विजयी आशिर्वाद प्रदान करणारी आहे. जनतेचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपल्याला सन्मानजनक विजयाचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.यावेळी आ.नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा,गयाताई कराड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


मोदी परिवाराकडून पंकजा मुंडेंचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत


        भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. अंबाजोगाईत आज माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी व परिवाराकडून अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले.

          बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचे मोदी परिवाराच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी भेटीदरम्यान कौटुंबिक तसेच लोकसभेच्या दृष्टीने अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार