परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

Lok Sabha Election: पंकजाताईचा झंझावात

 पंकजाताई मुंडे उद्या अंबाजोगाईत; योगेश्वरी देवीचे दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेणार भेटीगाठी



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

          भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि. 28 रोजी पंकजाताई मुंडे या अंबाजोगाई  शहरात असणार आहेत.या दौऱ्यात योगेश्वरी देवीचे दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्या घेणार आहेत.

          भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या  गुरुवार, दि. 28 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा अंबाजोगाई शहरातील दौरा आहे.सकाळी 11.00 परळी वैजनाथ येथुन अंबाजोगाई कडे रवाना,सकाळी 11.30 आगमन व श्री योगेश्वरी देवीचे दर्शन,दुपारी 12 ते 3.30 अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी,सायं 5 ते 5.30 अंबाजोगाई शहरातील व्यापारी बांधवांच्या भेटी स्थळ - नवा मोंढा, अंबाजोगाई,संध्या 6 ते 7 अंबाजोगाई शहरातील नागरीकांच्या भेटीगाठी, संध्या 7.15 अंबाजोगाई शहरातील डॉक्टर्सच्या भेटीगाठी,संध्या 7.45 ते रात्रौ 9.30 अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठीअसा दौरा कार्यक्रम आहे.

         या दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांच्या समवेत भाजपचे लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, महायुतीची नेतेमंडळी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!