इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

lरोजगार निर्मितीसाठी मोठा उद्योग, कॅन्सर रुग्णांसाठी उपचार सुविधा, मेडिकल काॅलेज

 पंकजाताई मुंडेंनी अंबाजोगाईत व्यापारी बांधवांसमोर मांडली जिल्हयाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट'


पालकमंत्री असताना जिल्हयासाठी खूप काम केलं ; लोकनेते मुंडे साहेबांचं विकासाचं अधुरं स्वप्न  पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या


अंबाजोगाई ।दिनांक २९।

लोकनेते मुंडे साहेबांनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते आपल्यातून अचानक निघून गेले आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पालकमंत्री असतांना जिल्हयात  खूप काम केलं, आता पुन्हा एकदा ती संधी मिळण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग व्हावा, कॅन्सर रूग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, चांगलं मेडिकल काॅलेज व्हावं अशी माझी इच्छा आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंटच व्यापारी बांधवांसमोर सादर केली.


   पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंद देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, पुरूषोत्तम भन्साळी, भूषण ठोंबरे   आदी यावेळी उपस्थित होते.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, बीड जिल्हयातील व्यवसाय वाढवायचा असेल तर अगोदर काही गोष्टी प्राधान्याने करणं आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन मी  पालकमंत्री असताना जिल्हयात रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी योजनेतून मोठया प्रमाणात कामं केली, कायदा सुव्यवस्था राखून व्यापा-यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. अशक्य असलेल्या रेल्वे प्रकल्पाला गती आणली. सुमारे दहा हजार कोटीचे रस्ते दिले. जी काही काम केली त्याची उदघाटन प्रीतमताईना करायला लावली. कुणाचा एक कप चहा घेतला नाही. विकासात कधी भेदभाव केला नाही. परळी विधानसभेत पराभव झाला पण मी खचून गेले नाही, पुन्हा काम सुरू केलं. लोकनेते मुंडे साहेबांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करायची संधी तुमच्यामुळे आता मिळेल याची मला खात्री आहे.


तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज

------

राजकारणात आज क्षणाक्षणाला बदल घडत आहेत. राजकारण डायनामिक होत चाललं आहे. सध्या तरी मी निवडणूकीची अर्धी लढाई जिंकली आहे, तथापि सर्वांनी योगदान दिलं तर ही निवडणूक सोपी होऊ शकते. मला दिलेलं आपलं प्रत्येक मत हे माझ्यावर तुम्ही ठेवलेलं कर्ज आहे असं समजा. हे कर्ज विकासाने फेडल्याशिवाय राहणार नाही हा माझा इतिहास आहे, मला आपला आशीर्वाद आणि साथ द्या असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमास शहरातील व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या