Motivational Story: मराठी माध्यम ते एमबीबीएस प्रतीक मुसळेचा प्रेरणादायी प्रवास

 मराठी माध्यम ते एमबीबीएस प्रतीक मुसळेचा प्रेरणादायी प्रवास



 परळी प्रतिनिधी....

-येलदरी अहमदपूर मुळगाव असलेला प्रतीक्, जन्म 25 मार्च 2002 रोजी झाला व इतरा प्रमाणेच आपले नशीब आज मावण्यासाठी जनाबाईच्या पवित्र नगरीत गंगाखेड येथील प्राथमिक शिक्षण करण्यासाठी प्रतीकचा प्रवास आपले वडील सुधाकर मुसळे व उषाताई मुसळे मॅडम यांच्यासोबत सुरू झाला. उषाताई मॅडम व सुधाकरराव मुसळे यांच्या     मेहनतीला व शिस्तप्रिय मार्गदर्शनाला प्रतीक मुसळे यांनी योग्य प्रतिसाद देऊन प्रयत्नाचे चीज केले. मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये उच्च ध्येय साध्य करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण प्रतीक मुसळे यांनी येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेले आहे. प्रतिक वाढदिवसानिमित्त विशेष गोष्ट अशी आहे की आजच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले आहेत , आणि पालकांचा ओढा हा विनाकारण इंग्रजी माध्यमाकडे जात आहे या निमित्ताने एवढेच आपण म्हणू शकतो की मराठी माध्यमात सुद्धा जर मेहनत केली तर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो हे उदाहरण प्रतीक मुसळे यांच्या उदाहरणातून आपण घेऊ शकतो.

प्रतीक मुसळे हा प्रथमपासूनच शैक्षणिक कारगिर्दमध्ये खडतर मेहनत करून चांगल्या रँक मध्येच उत्तीर्ण होत असे. त्याने मराठी माध्यमातून पहिली ते पाचवी शिकत असताना खूप अभ्यास करून नवोदय विद्यालय परभणी येथे चागली मार्क घेऊन नंबर लावला. नवोदय विद्यालय परभणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्याने दहावीला पण अत्यंत चांगले मार्क घेऊन, पुढील शिक्षणासाठी तो लातूर या नावाजलेल्या शहरांमध्ये गेला. आणि तिथेही आपल्या ला शोभेल असा अभ्यास करून नवले मेडिकल पुणे येथे एमबीबीएस या शाखेत प्रवेश मिळवला व आपल्या कुटुंबासोबतच आपल्या गावाचे व शिक्षकांचेही नाव रोशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रतीकचे पुरी पासूनच स्वप्न होते रुग्ण सेवा हीच समाजसेवा स्वीकारून देशाच्या योगदानामध्ये सहकार्य करून आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करावे हे त्याने पूर्ण करून दाखवलेले आहे. त्याच्या वैद्यकीय व्यवसायाचा गोरगरिबासाठी समाजासाठी दिवसेंदिवस भावा व त्याला दीर्घ आयुष्य लाभ व्हावे हीच जनाबाईच्या चरणी व वैजनाथाचे चरणी प्रार्थना.


✍️✍️ प्रा. गरड एल आर

 मॉडर्न कॉलेज परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !