विनम्र अभिवादन: कै.फुलचंद गित्ते (आबा)

एम. कॉम. बीएड शिक्षण घेतल्यानंतरही मातीशी घट्ट नातं ठेवणारे शेतीनिष्ठ 'आबा': कै.फुलचंद गित्ते

 काही व्यक्तिमत्व असे असतात की ते या लोकात नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र सदैव जाग्याच राहतात अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे कै. फुलचंद गित्ते  हे होत. परळी तालुक्यातील मलकापूर या गावातील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय संयमी, मितभाषी, सुस्वभावी असे व्यक्तिमत्व म्हणजे फुलचंद गित्ते होत. कै.फुलचंद गित्ते यांना परळी व पंचक्रोशीत सगळेजण सुस्वभावे म्हणून ओळखत होते. फुलचंद गित्ते यांचे निधन होऊन एक वर्ष कसे लोटले हे कळालेही नाही. आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांच्या स्मृती मात्र सदैव आठवणीतच राहणार आहेत. गित्ते परिवार व त्यांचे स्नेही, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सदैव त्यांच्या स्मृती आठवणीतच राहणार आहेत.


            परळी तालुक्यातील मलकापूर येथील एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून फुलचंद कोंडीबा गित्ते यांची ओळख होती. मलकापूर येथे अतिशय मेहनतीने व प्रगतिशील अशा प्रकारची शेती निष्ठेने करणारे शेतीनिष्ठ शेतकरी अशी ओळख त्यांनी परळी व परिसरात निर्माण केली होती. कै.फुलचंद कोंडीबा गित्ते हे अतिशय मितभाषी, अत्यंत हुशार, प्रेमळ स्वभावाचे व सदैव प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारे, सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. सर्वत्र त्यांना 'आबा' या नावाने ओळखले जात असायचे. त्यांनी आपल्या सुस्वाभावी व सदवर्तनातून सर्वांना आपलेसे केले होते. स्वतः एम कॉम बीएड शिक्षण झालेले असतानाही वडिलोपार्जित शेतीला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि कुटुंबाला आधारवड होऊन उभे करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अतिशय निष्ठेने शेती केली व आपले कुटुंब घडवले. शांत स्वभाव, संयमी वृत्ती, साधी राहणी यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, धार्मिक आदी सर्वच क्षेत्रात ते पुढे होऊन कार्यात अग्रेसर राहत होते. आपल्या कुटुंबाचा खंबीर आधार होत त्यांनी आपली मुले महादेव गित्ते, केशव गित्ते, वैभव गित्ते यांना सुसंस्कारित करून जीवनाचे वास्तव संस्कार केले. आपल्या स्नेही, नातेवाईक, मित्र मंडळ यांच्यात हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन आता एक वर्ष लोटले आहे. मात्र त्यांच्या वागण्या- बोलण्यातील आणि समाजात वावरण्याच्या सुसंस्कृत परंतु साधेपणाची आठवण त्यांच्या संपर्कातील प्रत्येकालाच सदैव त्यांच्या स्मृती जागवित राहणार आहे. कै. फुलचंद गित्ते यांचे आज शुक्रवार दिनांक 29/ 3/ 2019 रोजी प्रथम वर्षश्राद्ध असून त्यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!!!!

✍️ एमबी न्युज परिवार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !