बीडमध्ये भाजपाला धक्का: ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश

 बीडमध्ये भाजपाला धक्का: ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा शरद पवार गटात प्रवेश



परळी वैजनाथ, वृत्तसेवा...

        भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर अनेक वर्ष काम केलेले भगवान सेनेचे सरसेनापती यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फुलचंद कराड यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजपा नेत्यांने शरद पवार गटात प्रवेश केल्याने हा बीड भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

      दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत निकटचे सहकारी म्हणून अनेक वर्ष फुलचंद कराड यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केलेले आहे. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व संचालक म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून  विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यानंतर परत ते भाजपात आले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खा.नरेंद्रजी पाटील, आ.जितेंद्र आव्हाड , आ.राजेश टोपे आदी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !