पोस्ट्स

MB NEWS-पालकमंत्री धनंजय मुंडेंचा बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला बूस्टर डोस, 371 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्ह्यास प्राप्त*

इमेज
 * पालकमंत्री धनंजय मुंडेंचा बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला बूस्टर डोस, 371 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्ह्यास प्राप्त* बीड (दि. 11) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आटोकाट पणे सुरू असून, आज त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला ऑक्सिजनचा मोठा बूस्टर प्राप्त करून दिला आहे. ना.मुंडेंच्या माध्यमातून आज जिल्हा आरोग्य विभागाला 371 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स प्राप्त झाले आहेत. मागील आठवड्यात ना. मुंडेंनी बीड जिल्हा रुग्णालयास 30 बायपॅप मशिन्स सह 29 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आज प्राप्त 371 कॉन्संट्रेटर्स सह आता कॉन्संट्रेटर्सची एकूण संख्या 400 झाली आहे. हे कॉन्संट्रेटर्स जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याची क्षमता असलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स म्हणजे या कठीण परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांसाठी संजीवनीच म्हणावी लागेल, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यासह राज्यभरात आहे. त्यामुळे ना. मुंडेंच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागा

MB NEWS-खाजगी मालकीच्या जागेवर रमाई आवास योजना राबविण्याबाबत 8 दिवसात धोरण निश्चिती करा - धनजंय मुंडे* मुंबई

इमेज
 * खाजगी मालकीच्या जागेवर रमाई आवास योजना राबविण्याबाबत 8 दिवसात धोरण निश्चिती करा - धनजंय मुंडे* मुंबई (दि. 11) ---- : सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी खाजगी मालकीच्या किंवा शासकीय जागेत असलेल्या जागी रमाई घरकुल योजनेचा लाभ देता यावा याबाबतचे धोरण गृहनिर्माण विभाग, ग्रामविकास, महसूल विभाग व वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून तयार करावे, यासाठीचा प्रस्ताव 8 दिवसांच्या आत सादर करण्यात यावा असे निर्देश धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.  सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासंबंधीच्या आ. प्रणितीताई शिंदे यांच्या मागणीसंदर्भात आयोजित व्हर्च्युअल बैठकीत ना. मुंडे बोलत होते.  सोलापूर महापालिका हद्दीत जवळपास 220 झोपडपट्ट्या आहेत, यातील अनेक झोपड्या खाजगी जागेत, अतिक्रमणित शासकीय जागेत आहेत. अशा खाजगी जागेत रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतेही धोरण नाही.  त्यामुळे खाजगी मालकीच्या जागेवर किंवा शासकीय मालकीच्या जागेवर रमाई आवास योजनेचा लाभ देण्याबाबतचे धोरण शासन

MB NEWS-दिवस उजाडताच घोर लसिकरणाचा; परळीत लसिकरणासाठी गर्दी-आॅनलाईन,आॅफलाईनच्या घोळात नागरिक ताटकळले

इमेज
  दिवस उजाडताच घोर लसिकरणाचा; परळीत लसिकरणासाठी गर्दी-आॅनलाईन,आॅफलाईनच्या घोळात नागरिक ताटकळले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे.आज दि.११ दिवस उजाडताच  लसिकरणाचा घोर नागरिकांना लागल्याचे दिसून आले.सकाळपासुनच लसिकरणासाठी निगरिकांनी केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.आॅनलाईन,आॅफलाईनच्या घोळात नागरिक ताटकळले. लसिकरणासाठी काही सुटसुटीत व्यवस्था लागणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.     लसिकरणासाठी नागरिकांना सुव्यवस्था देण्याची गरज आहे मात्र प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागातील लोकच संभ्रमात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागरिकांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.सकाळपासुन औष्णिक वीज निर्मिती केंद्र वसाहतीच्या प्रवेशद्वारावर नागरीकांना आठवून नोंदणीची शहानिशा केली जात आहे.ताटकळत रहावे लागत असल्याने नागरीक वैतागून गेले आहेत.याबाबत संबंधित यंत्रणेने सुटसुटीत नियोजन करावे व नागरीकांची कुचंबणा थांबवावी अशी मागणी होत आहे.

MB *आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह सर्वच सरकारी दवाखाने करावेत कोव्हीड सेंटर.... News by Prakash Chavan

इमेज
 * सरकारी रूग्नालये कमी पडल्याने कोरोणाचा झाला बाजार* *आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह सर्वच सरकारी दवाखाने करावेत कोव्हीड सेंटर*  परळी वै.ता.१०/प्रकाश चव्हाण.....     आरोग्य विभागाने असलेल्या साधनांचा वापर योग्य रितीने केल्यास कोव्हीड रूग्न खाजगी ऐवजी सरकारी रूग्नालयात दाखल होतील. परिणामी रूग्नांच्या खिशावर पडणारा आर्थीक भार कमी होईल. प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेच्या वास्तु न राहता कोव्हीड सेंटर मध्ये रूपांतरीत होणे आवश्यक आहे.       देशभरात जानेवारी २०२० पासुन कोरोणा रूग्न आढळुन येत होते. महाराष्ट्रात ४ मार्च २०२० रोजी पहिला कोरोणा पॉझीटिव्ह रूग्न पुण्यात निघाला होता. त्याच महिन्यात २२ तारखे पासुन देशभरात लॉकडाउन लावण्यात आला होता. जुलै-ऑगस्ट २०२० पर्यंत वाढत गेलेला आकडा त्यानंतर मात्र खाली आला होता. कोरोणाचा संसर्ग यापुढे होणार नाही असा समज जानेवारी २०२१ पर्यंत देशवासीयांचा झाला होता. परंतु फेब्रुवारी २०२१ पासुन कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने हातपाय पसरायला सुरू केले. मार्च महिन्यात कोरोणाने महाराष्ट्र व्यापला. एप्रील महिन्यात कोरोणाने दररोज ६८ हजार पेक्षा जास्त

MB NEWS- *सिद्धेश्वर इंगोले यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार*

इमेज
 *सिद्धेश्वर इंगोले यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार* परळी वै. प्रतिनिधी -: येथील शिवछत्रपती विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांना *कलाविष्कार कला ,क्रीडा व बहु शिक्षणसंस्था,भगोरा जि.अकोला** यांच्यावतीने चित्रकारिता क्षेत्रातील राजरत्न जानराव किर्दक *कलागौरव ** पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कलाविष्कार संस्थेच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार दिले जातात.याही वर्षी 2021 सालच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल यंदाच्या *कलागौरव पुरस्कारासाठी** सिद्धेश्वर इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.पुरस्काराचे वितरण लॉकडाऊन संपल्यानंतर तसेच कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अकोला येथे करण्यात येणार आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी चित्रकार मिलिंद इंगळे यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.  सिद्धेश्वर इंगोले यांच्या निवडीबद्दल श्री संत ज्ञानेश प्रतिष्ठानचे सचिव डॉ.प्रतापसिंह शिंदे, शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास शिंदे,

MB NEWS- *स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप*

इमेज
 *स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप* आळंदी, प्रतिनिधी...     स्वाभिमानी संघर्ष सेनेचे वतीने मातृदिना निमित्त आळंदी येथे खिचडी,पाणी बॉटल,सॅनिटायजर व फळे वाटप करण्यात आले.              रविवार दिनांक 9 मे 2021 रोजी आळंदी येथे स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने आळंदी येथे सर्व नियमाचे पालन करून तसेच कार्यक्रमाची सुरुवात पसायदान घेऊन सुरवात करण्यात आली व गरजू लोकांना खिचडी,पाणी बॉटल, फळे,सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी वैजनाथ सोनबा गुट्टे (सरचिटणीस स्वा. स.से, महाराष्ट्र राज्य),ऍड-शिवशंकर आघाव(कायदेशीर सल्लागारस स्वा.स.से),नितीन सांगळे (प्रदेश कार्याध्यक्ष वंजारी सेवा संघ युवा आघाडी),ह.भ.प.पांडुरंग विघ्ने महाराज,(लोकनेते गोपीनाथ मुंडे साधक आश्रम आळंदी)माऊली सेठ थोरवे (संत भगवान बाबा युवक संघटना उप जिल्हा प्रमुख पुणे),आमचे सहकारी धनराज पाटील, ज्ञानेश्वर वाडेकर(समाजसेवक), बालाजी फड (समाजसेवक) आदी उपस्थित होते. ----------------------- Video ------------------------------

MB NEWS-*🔴 दिलासादायक:कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी* ------------------------------------------

इमेज
  *🔴 दिलासादायक:कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी* ------------------------ नवी दिल्ली : मोठी जीवितहानी घडवलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांत उतार लागल्याचे दिसत आहे. ही लाट अनेक राज्यांत एक तर सपाट होताना किंवा तिचा आलेख खाली येताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश, बिहार या फार मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहे आणि रविवारी त्या संख्येत लक्षणीय घट झाली. पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या सपाट होऊ लागली आहे. सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये रुग्ण संख्येत रविवारी घसरण दिसली. या सगळ्याच राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंतिम आकडेवारी मध्यरात्रीनंतर मिळेल. या राज्यांत गेल्या आठवड्यात रुग्णसंंख्येत मोठी वाढ झाली होती त्यांना आता काहीसा दिलासा मिळू शकेल. लॉकडाऊ

MB NEWS-पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार. शेतकऱ्याचे एक लाख विस हजाराचे नुकसान

इमेज
  पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार शेतकऱ्याचे एक लाख विस हजाराचे नुकसान अंबाजोगाई [प्रतिनिधी ] अंबाजोगाई तालुक्यात दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना रविवारी दि.9 घडली. शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथील शेतकरी बंडू कुलकर्णी यांच्याकडे चार बैल आहेत. त्यातील दोण बैल लिंबाच्या झाडाखाली बांधले होते तर दोन बैलावर शेतात मशागत सुरू होती. आचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने कुलकर्णी यांचा गडी कुळवाचे बैल तसेच सोडून गोट्याकडे धावत येत होता. त्यावेळी लिंबाच्या झाडावर विजेचा कडकडाट झाला.विजेच्या कडकडाटात दोन बैल जाग्यावर ठार झाल्याची घटणा रविवारी घडली .बैल ठार झाल्यामुळे शेतकऱ्याचे एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी बंडू कुलकर्णी यांनी दिली.

MB NEWS-प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ,अनेकांना जीवदान मिळेल :- डॉ संतोष मुंडे*

इमेज
 * प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ,अनेकांना जीवदान मिळेल - डॉ संतोष मुंडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यात कोविडच वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे तेव्हा लोकांनी भीती न बाळगता संयम आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी म्हंटले आहे ते पुढे म्हणले आहेत ज्या लोकांना कोविड होऊन गेला आहे ते आता पूर्णपणे बरे आहेत अश्या लोकांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावा जेणे करून आपल्या प्लाझ्मा दान केल्यामुळे एखाद्याला नवंजीवन मिळेल अश्या सर्व लोकांनी प्लाझ्मा दान करावा व असल्या संकटात प्लाझ्मा दान करून एक आदर्श आपल्या समाजापुढे ठेवावा प्लाझ्मा दिल्यामुळे अनेक लोकांना रेमडीसीमवर इंजेक्शनची जास्त अवश्यकता लागणार नाही त्या मुळे इंजेक्शनची होणारा तुटवडा भासणार नाही तेव्हा सर्व प्लाझ्मा दान करणाऱ्या लोकांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावे असे मत डॉ संतोष मुंडे यांनी व्यक्त केले आहे.                 कोरोनाग्रस्ताला जीवदान मिळू शकते अशा प्लाझ्मा दानाबाबत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी प्

MB NEWS-आठ.वर्षीय बालिकेने केला रमजान पहिला रोजा

इमेज
  आठ.वर्षीय बालिकेने केला रमजान पहिला रोजा पूर्णा/प्रतिनिधी....... पूर्णा येथील मस्तानपुरा भागातील आलिया अफजल पठाण या 08.वर्षीय मुलीने पवित्र रमजान महिना सुरू असून पहिला रोजा उपवास धरून देशात चालत असलेल्या कोरोना महामारीचा विनाश व्हावा या संकटातून या व्हायरस चा अंत व्हावा अशी रमजान पहिला रोजा करून नमाज अदा करत अल्ला माझ्या भारत देशातुन व्हायरस चा अंत करा सर्व देश वासीय बांधवास या महामारीतून सुटका व्हावी अशी विनंती करत या 08.वर्षीय मुलीने रोजा उपवास केला आहे. आलिया अफजल खान पठाण या चिमुकलीने केलेल्या रोजा ने पूर्णा शहरातील नागरिकांनी सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.08 वर्षीय मुलीने देवास सांगाडे घालत देशातील कोरोना महामारीचा सर्वनाश व्हावा सर्व देशातील बांधवास या बिमारीतून सुटका व्हावी म्हणत रोजा उपवास केल्याने सर्व स्तरातुन या चिमुकलीचे कौतुक केले जात आहे.

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !* *योगा, प्राणायाम, तज्ज्ञ डाॅक्टर्सची तपासणी, पौष्टिक आहारामुळे पांच रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले*  परळी । दिनांक ०८ ।  नित्यनेमाने होणारे योगा, प्राणायामाचे धडे, तज्ज्ञ डाॅक्टर्सच्या टिमची मेहनत, आयुर्वेदिक काढयासह पौष्टिक आहार आणि पोषक वातावरण या सर्वांमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील कोरोना बाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून सेंटर मधील पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.     कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालयात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना द

MB NEWS-वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*

इमेज
 * वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला * *परळी वै.ता.८ प्रतिनीधी*     वीस दिवसा पासुन बंद असलेला वडखेल चा पाणी पुरवठा प्रशासनाच्या सामंजस्य भुमीकेमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष रस्तयावरील दगड माती काडुण पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.      परळी तालुक्यातील वडखेल येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी लगतच्या शेतकऱ्यांनी विहीरीच्या आजुबाजुला दगड व मातीचे ढिगारे टाकुण रस्ता अडविला होता. त्यामुळे गावकऱ्याचा मागील विस दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी बुधवारी (ता.५) ग्रामसेवकांकडे लेखी निवेदण देउन गावचा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. याच्या बातम्या सर्वत्र प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या शनिवारी (ता८) वतीने तलाठी डिगांबर साबने व ग्रामसेवक अविनाश तोटे यांनी वडखेल येथे जाउन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेउन समजाउन सांगीतले. शेतकऱ्यांनी चुक मान्य करूण तेथील दगड व मातीचे ढिगारे जेसीबीच्या सहाय्याने काढुण घेतले. मागील विस दिवसापासुन बंद असलेला पाणी पुरठा श

MB NEWS- पत्रास कारण की..........लेख:-मंजुश्री घोणे

इमेज
 * प्रिय, मित्र-मैत्रिणींनो* *पत्रास कारण की,* *आता खोटं बोलूच शकत नाही?* करण आता खाली सगळं सोडून आलो आहे? खरं सांगू माझ्याकडे सर्व धन संपदा नाव हे सर्व काही होतं. ज्यावेळेस पहिला कोरोना संकट आले तेव्हा वेळीच महामारी चे  लक्षण ओळखून सरकारने तात्काळ कडक लॉक डाऊन घोषित केले सर्व सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस व सफाई कामगार हे सर्व जण तर जसं काय हे माणसाच्या रूपात जणू काय ईश्वरच आपल्या मदतीला आले का काय? आपणही सर्वजणांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे पाहता पाहता कोरोनाची पहिली लाट हळूहळू कमी होत गेली? तरी पण सरकार आपल्या सर्वांना सतर्क करीत होती येणारी दुसरी कोरोनाची लाट खूप भयंकर आहे? बघता बघता बाजारपेठ लग्न समारंभ प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि येणाऱ्या दुसऱ्या कोरोना लाटेचा तुम्हाला मला विसर पडत गेला आणि सुरू झाल्या गल्लीतील व पारावरील कोरोनाच्या गप्पा कोरोना कुठे आहे कोरोनाच्या नावावर सरकार पैसे खात आहेत असे अनेक गोष्टीवर चर्चा रंगत होत्या मला ही नियमाच अजिबात भान नाही राहिलं बघता-बघता खतरनाक कोरोनाची दुसरी लाट माझ्या देशात येऊन धडकली व सर्व अधिक कोरोनाचे माझ्या महाराष्ट्रात थैमान घ

MB NEWS-सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण* *परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम*

इमेज
 * सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण* *परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम*   सिरसाळा (दि. 07) ---- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उद्या पासून मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.  यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी येथे उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून, रुग्णांना भोजन, नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबत सूचना केल्या. येथे दाखल रुग्णांना नाथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने भोजनही मोफत देण्यात येणार आहे.   यावेळी परळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, रा. कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, संजय गांधी निराधार समितीचे

MB NEWS-फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला* *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत*

इमेज
 * फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला*  *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत* मुंबई दि. 6 ---- कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना फेसबुक वरील एका कुबेर नावाच्या समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.  साधारण पणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक श्री. संतोष जगन्नाथ लहामागे यांनी फेसबुक वर कुबेर नावाच्या एका समुहाची स्थापना केली. शिक्षण , कला , क्रिडा , राजकारण , समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समुह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.  याच समाजभावनेमधून पूर्वी या समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील ओढ्याचे रुंदीकरण , पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत , रक्तदान शिबिरं , शाहदा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान , विविध अनाथ आश्रमातील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप , व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम , वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे व

MB NEWS-*लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*

इमेज
  *लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक* परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)           परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून लसीकरणाचा दुसरा टप्पा १मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाला आहे.शहरात लसीकरणाला वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी भाजयुमो प्रदेश चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे .       परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढवत आहोत याचेही भान नागरिक नाईलाजाने ठेवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शह

MB NEWS-परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम* *लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत*

इमेज
 * परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम* *लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत* परळी वैजनाथ - सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या भीषण परिस्थिती मध्ये चौधरी दाम्पत्यांनी स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. प्राध्यापक नितीन चौधरी व डॉक्टर मीना म्हात्रे-चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च टाळत ती रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती विमोचन समिती पुर्व बीड ला देऊ केलेली आहे यामध्ये या समितीतर्फे विविध रुग्णालयात गरजूंना भोजनाची व्यवस्था, मार्गदर्शन केंद्र , लसीकरण जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.                             आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य व गरजू लोकांना ICU बेड मिळणे खूप कठीण झाले आहे सातत्याने लोकहीतकारी व लोककल्याणकारी प्रकल्पासाठी पुढाकार घेवून अश्या कठीण प्रसंगी जीवनवायू, प्राणवायू पुरवठा तयार करणाऱ्या ऑक्सिजन concentration मशीन उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत या मशीनच्याद्वारे हवेतून ऑक्सीजन तयार केला जातो तसेच रूग्ण अत्यावस्थ स्थितीत जाण्यापासून त्यास तात्काळ ऑक्सीजन उप

MB NEWS- *बीड : आयटीआय येथील कोविड केअर सेंटरला धनंजय मुंडेंनी दिली भेट* *244 ऑक्सिजन बेड होत आहेत तयार, 50 बेड उद्यापासून होणार कार्यान्वित*

इमेज
 *बीड : आयटीआय येथील कोविड केअर सेंटरला धनंजय मुंडेंनी दिली भेट* *244 ऑक्सिजन बेड होत आहेत तयार, 50 बेड उद्यापासून होणार कार्यान्वित* बीड (दि. 07) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे नगर रोड वरील आयटीआय येथे 244 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे, तेथे ना. मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली.  नगर रोड वरील शासकीय आयटीआय येथे एकूण 244 ऑक्सिजन बेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येथे 50 ऑक्सिजन बेड उद्या (दि. 08) पासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. येथे उपलब्ध असलेल्या सुविधा, ऑक्सिजन पॉईंट, उपलब्ध डॉक्टर्स व अन्य स्टाफ आदी सर्व बाबींची ना. मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.  यावेळी माजी आ. प्रा. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आदी उपस्थित होते.  आयटीआय येथे उपलब्ध ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, तसेच

MB NEWS-ऑनलाईन नोंद करणाऱ्या का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला आगोदर "लस " मिळणार ??? जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट करावे.... प्रा पवन मुंडे "सोशल डिस्टनन्स" फज्जा उडाल्याने कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता..!

इमेज
  ऑनलाईन नोंद करणाऱ्या का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला आगोदर "लस " मिळणार ??? जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट करावे.... प्रा पवन मुंडे "सोशल डिस्टनन्स" फज्जा उडाल्याने कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता..! परळी प्रतिनिधी : परळी शहर व तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेत प्रचंड गोंधळ चालू असून तासंनतास नागरिक आरोग्य केंद्रावर उभे राहून सुद्धा नागरिकांना लस मिळत नसून,ऑनलाईन नोंद केलेल्या नागरिकांना ऑफलाईन नोंद करा असे तर ऑफलाईन नोंद असलेल्या नागरिकाला ऑनलाईन नोंद करा असे सांगितले जात असून नागरिकांनी नेमकी कशी नोंद करावी याचे स्पष्टीकरण जिल्हा व परळी आरोग्य विभागाने स्पष्ट करावे असे आवाहन भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.      शहरात लसीकरणात प्रचंड गोंधळ निर्माण होत सामान्य नागरिकां बरोबर जेष्ठ नागरिकांची सुद्धा लसीकरण केंद्रावर तासंनतास रांगेत उभा राहून लस मिळत नसल्याने नागरिक परेशान होत आहेत,लसीकरण केंद्रावर "सोशल डिस्टन्स " पूर्णपणे फज्जा उडाल्याने एखाद्या लक्षणं नसणारा कोविड रुग्ण लस घेण्यासाठी आला असेल तर त्याच्या कडून इतर लोकांना सुद्या संसर्ग होण्

MB NEWS-ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू - राजेश गिते

इमेज
  ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता  प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू   - राजेश गिते                परळी वैजनाथ..... तालुका ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी लोक लसीकरण केंद्र या ठिकाणी जात होती.प्रशसनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आज च्या परिस्थिती गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन मोठ्या गावात जसे नागापूर, धर्मापुरी, सिरसाळा,आशा ठिकाणी बर्याच गावातील लोकांना बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहे ज्या मुळे एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो आहे. प्रशास्नाने याची दखल घेऊन त्वरित बंद केलेली लसीकरण मोहीम गावोगावी पुन्हा सुरू करावी अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव  पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्

MB NEWS- *लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण*

इमेज
  _ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' उपक्रम_  *लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण* _परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_ परळी (दि. 05) ---- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीकरांसाठी 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' (समाज हितासाठी) हा अभिनव उपक्रम  सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.         'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' (समाज हितासाठी)  या उपक्रमांतर्गत परळीतील नागरिकांना लसिकरण केंद्रपर्यंत जाणे येणे साठी मोफत सिटी बस सेव सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय दुर होणार आहे.आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे,बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,सुरेशअण्णा ट

MB NEWS-दुःखद वार्ता: पैलवान अर्जुन पवार यांचे निधन

इमेज
  दुःखद वार्ता: पैलवान अर्जुन पवार यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.     सर्वपरिचित पैलवान अर्जुन ज्ञानोबा पवार यांचे हृदयविकाराने आज दुपारी निधन झाले.मृत्युसमयी ते ३८ वर्षे वयाचे होते.      त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ,एक बहीण, दोन मुले असा परिवार आहे.बालाजी ज्ञानोबा पवार यांचे ते बंधू होत.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वा.अंंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांना कोरोनामुक्तीकडे घेऊन जात स्वत: कोरोनाशी लढा देणारा असाही एक योद्धा!

इमेज
  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांना कोरोनामुक्तीकडे घेऊन जात स्वत: कोरोनाशी लढा देणारा असाही एक योद्धा! परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         कोरोना विषाणू विरोधात संपूर्ण जग लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. प्रशासनात काम करणारे अनेक डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे जीवाचे रान करून प्रसंगी स्वतः:चा जीव पणाला लावून सेवाकार्य बजावत आहेत.एकप्रकारे असाच वास्तुपाठ परळी तालुक्यातील नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे आरोग्य अधिकारी. डॉ.विकास मोराळे यांनी घालून दिला आहे. प्रचंड संक्रमित झालेली नागापुरसह अन्य गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.मात्र दिवसरात्र कोरोनामुक्तीसाठी धडपड करणारे डॉ.विकास मोराळे सध्या स्वत: कोरोनाशी लढा देत आहेत. परळी वैजनाथ तालुक्यातील नागापूर येथे गेल्या महिनाभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. एप्रिल महिन्यात जवळपास २५० रुग्ण या गावात निघाल्याने तालुक्यात हे गाव हाँटस्पाँट बनले होते. गावाच्या एकजूटीने व सर्वांच्या प्रयत्नामुळे

MB NEWS-• *सृजनशीलतेत गौरवशाली: परळीचा आरव गित्ते बनला लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल!* ⬛ *वेबसाईट डिझायनर,अॅप डेव्हलपर व डिव्हिजिब्लिटी प्रमाणपत्राचा ठरला मानकरी*⬛

इमेज
  • *सृजनशीलतेत गौरवशाली: परळीचा आरव गित्ते बनला लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल!*  ⬛ *वेबसाईट डिझायनर,अॅप डेव्हलपर व डिव्हिजिब्लिटी प्रमाणपत्राचा ठरला मानकरी*⬛ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी वैजनाथ ही अनेक रत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रात येथील व्यक्तीमत्त्वे आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये परळीतील बालकं ही मागे नाहीत याचा प्रत्यय नुकताच आला असुन परळीतील आरव मधुकर गित्ते याने लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल क्रमांक पटकावला आहे.अॅप/ गेम डेव्हलपर, वेबसाईट डिझायनर व डिव्हिजिब्लिटी अशा तीनही प्रमाणपत्राचा तो मानकरी ठरला आहे. यापुर्वी तो भारतातुन पहिल्या दहा विद्यार्थ्यांत समाविष्ट झाला होता.अल्पावधीतच त्याने प्रथम क्रमांकावर येत उत्तुंग भरारी घेतली आहे.त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       लिडो लर्निंग ही एक एडटेक स्टार्टअप आहे. ज्यामध्ये तरुण मुलांना कोडिंग शिकवण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रोग्रामिंग शिकण्यास तयार केले जाते आणि त्यानंतर गेम, अ‍ॅनिमेशन आणि अनुप्रयोग (अॅप्स) तयार करण्यास प्रोत्सा

MB NEWS-आॅनलाईन सिस्टीमचा चकवा: कोविड लसीकरण न होताच मिळालं लस दिल्याचे प्रमाणपत्र ! नागरीकांत संभ्रम: कार्यवाही करा - प्रा पवन मुंडे

इमेज
  आॅनलाईन सिस्टीमचा चकवा: कोविड लसीकरण न होताच मिळालं लस दिल्याचे प्रमाणपत्र  ! नागरीकांत संभ्रम: कार्यवाही करा - प्रा पवन मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी :     परळी येथील सावतामाळी मंदिर परिसरातील खंडोबा मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 मे 2021 रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली,या लसीकरण मोहिमेत आॅनलाईन नोंदणी केलेल्या एका महिलेला लस न मिळताच तिला लसीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे.लसीसाठी लोकांची अगोदरच तारांबळ उडाली असताना आता आपल्याला लस मिळणार नाही यामुळे ही महिला हवालदिल झाली.याबाबत या महिलेने नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली. दरम्यान हा प्रकार आॅनलाईन सिस्टीमचा चकवा असल्याचे आता समोर आले आहे.असा प्रकार अपवादाने घडला तरी नागरीकांनी संभ्रमित होउ नये वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत कळवले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.         सत्यभामा आत्माराम पांचाळ , वय 59 रा.किर्तीनगर ही महिला खंडोबा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेली असता त्या महिलेची