MB NEWS- पत्रास कारण की..........लेख:-मंजुश्री घोणे



 *प्रिय, मित्र-मैत्रिणींनो*

*पत्रास कारण की,*

*आता खोटं बोलूच शकत नाही?* करण आता खाली सगळं सोडून आलो आहे?

खरं सांगू माझ्याकडे सर्व धन संपदा नाव हे सर्व काही होतं.

ज्यावेळेस पहिला कोरोना संकट आले तेव्हा वेळीच महामारी चे  लक्षण ओळखून सरकारने तात्काळ कडक लॉक डाऊन घोषित केले

सर्व सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस व सफाई कामगार हे सर्व जण तर जसं काय हे माणसाच्या रूपात जणू काय ईश्वरच आपल्या मदतीला आले का काय?

आपणही सर्वजणांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे पाहता पाहता कोरोनाची पहिली लाट हळूहळू कमी होत गेली?

तरी पण सरकार आपल्या सर्वांना सतर्क करीत होती येणारी दुसरी कोरोनाची लाट खूप भयंकर आहे?

बघता बघता बाजारपेठ लग्न समारंभ प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि येणाऱ्या दुसऱ्या कोरोना लाटेचा तुम्हाला मला विसर पडत गेला आणि सुरू झाल्या गल्लीतील व पारावरील कोरोनाच्या गप्पा कोरोना कुठे आहे कोरोनाच्या नावावर सरकार पैसे खात आहेत असे अनेक गोष्टीवर चर्चा रंगत होत्या मला ही नियमाच अजिबात भान नाही राहिलं बघता-बघता खतरनाक कोरोनाची दुसरी लाट माझ्या देशात येऊन धडकली व सर्व अधिक कोरोनाचे माझ्या महाराष्ट्रात थैमान घातले याला कारण मी जबाबदार मी सरकारी सांगितलेली नियम न पाळल्यामुळे कारण हो तसा मला गर्व झाला होता पण काय बघता बघता संपूर्ण हॉस्पिटल कोविंड सेंटर हाऊसफुल झाले आणि फक्त एम्बुलेंस सायरन कानी पडत होते आणि हो बघता बघता कोरोना महामारीने मलाही गाठलं असे समजताच माझे घरची ही मंडळी माझ्यापासून दूर जात होती हे सर्व मी माझ्या डोळ्याने पाहत होतो खरंच त्या सर्व कोरोना योद्ध्याला माझा साष्टांग नमस्कार समाज मलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले पहातो तर काय ऑक्सिजन मुळे लोक तडफडत होती परस्थिती पाहवत नव्हती तसा मलाही ऑक्सिजन बेड देण्यात आला

माझाही विलाज डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी करत होते पण काय बघता बघता ऑक्सिजन कमतरतेमुळे लोक मरण पावत होते

आणि शेवटी माझाही अंत झाला याला जबाबदार मी कारण मी नियम पाळले असते तर

झाडे लावली व जगवली असती तर

ही वेळ माझ्यावर आली नसती

माझा फोटो पाठवत आहे आणखी ही वेळ गेलेली नाही कृपया नियमाचं पालन करा व तुम्ही सर्वजण कोरोना महामारी ला हरवा

तसे तुम्ही सर्वजण समजदार आहात अशी आशा बाळगतो... 

                   *तुमचाच*

             *( मृत्य मानव मित्र )*


*शब्दांकन - कु. मंजुश्री सुरेश घोणे* 

*मो. ९४२०८८४०४१*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार