MB *आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह सर्वच सरकारी दवाखाने करावेत कोव्हीड सेंटर.... News by Prakash Chavan

 *सरकारी रूग्नालये कमी पडल्याने कोरोणाचा झाला बाजार*



*आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह सर्वच सरकारी दवाखाने करावेत कोव्हीड सेंटर* 


परळी वै.ता.१०/प्रकाश चव्हाण.....


    आरोग्य विभागाने असलेल्या साधनांचा वापर योग्य रितीने केल्यास कोव्हीड रूग्न खाजगी ऐवजी सरकारी रूग्नालयात दाखल होतील. परिणामी रूग्नांच्या खिशावर पडणारा आर्थीक भार कमी होईल. प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेच्या वास्तु न राहता कोव्हीड सेंटर मध्ये रूपांतरीत होणे आवश्यक आहे.


      देशभरात जानेवारी २०२० पासुन कोरोणा रूग्न आढळुन येत होते. महाराष्ट्रात ४ मार्च २०२० रोजी पहिला कोरोणा पॉझीटिव्ह रूग्न पुण्यात निघाला होता. त्याच महिन्यात २२ तारखे पासुन देशभरात लॉकडाउन लावण्यात आला होता. जुलै-ऑगस्ट २०२० पर्यंत वाढत गेलेला आकडा त्यानंतर मात्र खाली आला होता. कोरोणाचा संसर्ग यापुढे होणार नाही असा समज जानेवारी २०२१ पर्यंत देशवासीयांचा झाला होता. परंतु फेब्रुवारी २०२१ पासुन कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने हातपाय पसरायला सुरू केले. मार्च महिन्यात कोरोणाने महाराष्ट्र व्यापला. एप्रील महिन्यात कोरोणाने दररोज ६८ हजार पेक्षा जास्त रूग्न बाधित होत होते. दररोज आठशे पेक्षा जास्त रूग्न महाराष्ट्रात रूग्न मृत्यु पावत होते. नोंद नसलेल्यांची संख्या हजाराच्या पुढे असणार आहे.

       कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा हतबल झालेली दिसली. तेथुन पुढे सुरू झाला कोरोणाच्या नावाने बाजार सुरू. सरकारी व खाजगीत WHO च्या प्रोटोकॉल नुसार उपचार करण्यात येतो. रूग्नावर सरकारीत उपचार मोफत तर खाजगीत बाजार दरानुसार उपचार करण्यात येत आहेत. कोरोणानी गंभीर होणाऱ्या रूग्नांचा सरकारी असोत की खाजगीत असोत मृत्यु होत आहेत. तरीही रूग्नांचा कल हा खाजगी दवाखान्याकडेच जास्त असतो. प्रोटोकॉलनुसार उपचार होतात परंतु खाजगी रूग्नालयात दरपत्रक लावण्यात आलेले नाहीत.

     राज्यसरकारनी कोरोणाच्या पहिल्या लाटेत धडा घेउन तयारी करणे आवश्यक होते. आरोग्य विभागाकडे वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्नालयात ज्या पध्दतीने कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले. त्याच पध्दतीने उपजिल्हा रूग्नालय, नागरी रूग्नालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य ईमारती आहेत. या सर्व ठिकाणी कोव्हीड तपासणी व उपचार केंद्र सुरू केले असते तर निदान लवकर लागुन उपचार होउन रूग्न बरे होण्याचे प्रमाण आत्ता आहे त्यापेक्षा जास्तीचे राहीले असते. ग्रामीण भागातील रूग्न भितीपोटी तपासणी करूण घेत नाहीत. तपासणी व उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करा रूग्न तपासणीसाठी मोठया प्रमाणात येतील.

    शासणानी आरोग्य यंत्रणा योग्य रितीने न राबविल्यामुळेच कोरोणाच्या नावानी बाजार सुरू झाला आहे. कोरोणाच्या बाजारात ज्याला जमेल तस विकण्याचा प्रयत्न करित आहेत. कोरोणावर सरकारीत मोफत तर खाजगीत लाखांमध्ये बीले होत आहेत. यावर सरकारने निर्बंध आनने आवश्यक असतांना त्यांनीच हात टेकल्याने खाजगीवाल्यांचे भाव वधारले. आत्ता जरी याकुन धडा घेउन सर्व सरकारी दवाखान्यात तपासणी व उपचार सुरू झाल्यास रूग्नांचे करोडो रूपये वाचु शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !