इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण*

 _ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' उपक्रम_

 *लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण*

_परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_



परळी (दि. 05) ---- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीकरांसाठी 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' (समाज हितासाठी) हा अभिनव उपक्रम  सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.



        'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' (समाज हितासाठी)  या उपक्रमांतर्गत परळीतील नागरिकांना लसिकरण केंद्रपर्यंत जाणे येणे साठी मोफत सिटी बस सेव सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय दुर होणार आहे.आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे,बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,सुरेशअण्णा टाक,बाशित भाई,अॅड. जीवनराव देशमुख,चेतन सौंदळे,शंकर कापसे,रवि मुळे,धम्मा अवचारे,नागेश हालगे, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या