MB NEWS-फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला* *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत*

 *फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला*



 *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत*



मुंबई दि. 6 ----

कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना फेसबुक वरील एका कुबेर नावाच्या समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 


साधारण पणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक श्री. संतोष जगन्नाथ लहामागे यांनी फेसबुक वर कुबेर नावाच्या एका समुहाची स्थापना केली. शिक्षण , कला , क्रिडा , राजकारण , समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समुह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. 


याच समाजभावनेमधून पूर्वी या समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील ओढ्याचे रुंदीकरण , पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत , रक्तदान शिबिरं , शाहदा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान , विविध अनाथ आश्रमातील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप , व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम , वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप , श्री प्रकाश आमटे , श्री व सौ कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत , सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम या पूर्वीही केलेले आहेत. 


कोरोनाचा वाढता कहर पाहता या समुहाने महाराष्ट्रातील करोनाग्रस्त जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन लाख रुपयांचा निधी द्यावा असा ठराव फौंडेशन चे अध्यक्ष श्री. संतोष लहामगे , उपाध्यक्ष श्री. प्रशांत जोशी , कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत माने , सचिव सौ. मिनल गिरडकर , खजिनदार श्री. नन्दू सावंत , प्रवक्ते श्री. प्रशांत दौडकर , कुबेर फौंडेशन चे सर्व संचालक मंडळ तसेच फौंडेशन चे सदस्य डॉ. अभिजित कदम , ऍड. लीना प्रधान गुरव , जतीन तिवारी , शैलेश कलंत्री , अमेय सोनावणे , नितीन नरखडे , प्रशांत दाते यांच्या संमती प्रारीत करण्यात आला. 


आज दिनांक ७ मे २०१९ रोजी सदर धनादेश आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कडे सुपूर्द केला. 


यावेळी कुबेर फौंडेशन चे सन्माननीय सदस्य ऍड. प्रशांत गुंजाळ , सचिन गणोरे , शोहरब पठाण , अमोल बस्ते , प्रथमेश बेल्हेकर , गौरव डोंगरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार