प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांना कोरोनामुक्तीकडे घेऊन जात स्वत: कोरोनाशी लढा देणारा असाही एक योद्धा!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
कोरोना विषाणू विरोधात संपूर्ण जग लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. प्रशासनात काम करणारे अनेक डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे जीवाचे रान करून प्रसंगी स्वतः:चा जीव पणाला लावून सेवाकार्य बजावत आहेत.एकप्रकारे असाच वास्तुपाठ परळी तालुक्यातील नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे आरोग्य अधिकारी. डॉ.विकास मोराळे यांनी घालून दिला आहे. प्रचंड संक्रमित झालेली नागापुरसह अन्य गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.मात्र दिवसरात्र कोरोनामुक्तीसाठी धडपड करणारे डॉ.विकास मोराळे सध्या स्वत: कोरोनाशी लढा देत आहेत.

परळी वैजनाथ तालुक्यातील नागापूर येथे गेल्या महिनाभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. एप्रिल महिन्यात जवळपास २५० रुग्ण या गावात निघाल्याने तालुक्यात हे गाव हाँटस्पाँट बनले होते. गावाच्या एकजूटीने व सर्वांच्या प्रयत्नामुळे गाव कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ५ हजार ८०९ लोकसंख्येचे व १ हजार १६२ लोकवस्ती असलेले नागापूर हे गाव. या गावचा परळी शहराशी वेगळा संबंध आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणारे वाण धरण या गावात आहे. यागावात शेतकरी कुटूंबे मोठ्या संख्येने आहेत. आपले शेत भले, गाव भले माननारे अनेक लोक आहेत. मात्र असे असतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने या गावात प्रवेश केला. प्रवेश करताच गावातील लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. मार्चच्या शेवटी व एप्रिल महिन्यात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच गेली. १० एप्रिल च्या आसपास फक्त संसर्गच नाही तर एकाच दिवशी गावातील ६ रहिवाशांचा कोरोनाने मृत्यू झाला. रोजच्या रोज गावात १० ते १५ तर एकेदिवशी तब्बल २५ रुग्ण आढळले.यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तातडीने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांनी पावले उचलली साखळी तर तोडणे आवश्यक होते. कारण प्रत्येक घरात जवळपास एक रुग्ण आढळून येवू लागला. कोणी कोणाला बोलत नव्हते. कारण हा संसर्गजन्य रोग म्हणून रोज एकमेकांशिवाय न राहणारे एकमेकांकडे पाहणेही अवघड झाले होते. अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

ग्रामपंचायत च्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली. गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने गावातच अँटीजेन तपासणी कँम्प घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र नागापुरचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास मोराळे, सरपंच मोहन सोळंके, संतोष सोळंके व अन्य सजग नागरीकांनी गावात फिरून रहिवाशांना विनंती करत अँटीजेन तपासणी करण्याची विनंती केली. याबरोबरच गावचे सरपंच मोहन सोळंके यांनीही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात कोरोना विषयक उपाययोजना करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले. गावातील नागरीकांनीही एकत्र येवू स्वयंस्फूर्तीने गावात जनता कर्फू लागू केला. सर्व गावकऱ्यांनी नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.आरोग्य अधिकारी डॉ.विकास मोराळे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिवसरात्र सेवाकार्य बजावत नागरीकांत जनजागृती, तपासणी व आत्मविश्वास निर्माण केला.मोठ्याप्रमाणावर नागरीकांना टेस्ट करणे, लसीकरण करुन घेण्यास प्रवृत्त केले.याचा परिणामही दिसून आला. साखळी तुटण्यास मदत झाली. यामुळे २५ एप्रिल पासून गावातील रुग्णांची संख्या कमी होत गेली आहे. हे गाव आता कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
⬛आत्ताच कोरोना संपलेला नाही. त्यामुळे आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून १७ दिवस गावबंद केले म्हणून आज आपण सुखरूप आहोत. आरोग्य कर्मचारी यांनी खुप सेवाकार्य बजावले.
संतोष सोळंके,
सामाजिक कार्यकर्ते नागापुर
⬛ आमचे गाव हाँटस्पाँट बनले होते. पण गावकऱ्यांच्या सहकार्याने व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी आम्हाला खूप मदत केली. डॉ.विकास मोराळे व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी या काळात चांगले काम केले.गावात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यासाठीही जनजागृती करण्यात येत आहे. याचा परिणाम आज गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
- मोहन सोळंके,सरपंच
⬛
नागापुर प्राथमिक केंद्रांतर्गत जवळपास ३५ गावे येतात.सध्याच्या परिस्थितीत वाढणारी कोरोना संसर्ग साखळी रोखणे आमच्यापुढे आव्हान होते.त्यातही नागापुरसारखे मोठे गाव व वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब झाली होती.परंतु वरिष्ठांचे मार्गदर्शन, आमचे सर्व आरोग्य कर्मचारी, गावकरी यांच्या सहकार्याने हाॅटस्पाॅट बनलेले गाव पुर्वपदावर आले.साखळी तोडण्यात यश आले नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचे समाधान आहे. गेल्या पाच दिवसांपासून मी स्वतः:कोरोनाबाधित झालो आहे परंतु सर्वांच्या सदिच्छा पाठिशी आहेत.लवकरच पुन्हा लोकांच्या आरोग्य सेवेवर रुजु होईल.
- डॉ.विकास मोराळे
आरोग्य अधिकारी,नागापुर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा