इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*

 *लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*




परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)

          परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून लसीकरणाचा दुसरा टप्पा १मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाला आहे.शहरात लसीकरणाला वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी भाजयुमो प्रदेश चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे .

      परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढवत आहोत याचेही भान नागरिक नाईलाजाने ठेवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील गणेशपार भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून विद्यानगर प्रियानगर जलालपुर व अन्य परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

           एकापेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण सुविधा असेल तर आरोग्य यंत्रणेवरही अधिकचा ताण पडणार नाही. तसेच नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाचा प्रसारही होणार नाही. शहरात शिवाजी महाराज चौक परिसरात केंद्र सुरू करुन आवश्यक असलेली यंत्रणा तातडीने कार्यान्वित करुन नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजयुमो चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!