गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS-वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*

 *वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न*



*प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*


*परळी वै.ता.८ प्रतिनीधी*

    वीस दिवसा पासुन बंद असलेला वडखेल चा पाणी पुरवठा प्रशासनाच्या सामंजस्य भुमीकेमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष रस्तयावरील दगड माती काडुण पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

     परळी तालुक्यातील वडखेल येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी लगतच्या शेतकऱ्यांनी विहीरीच्या आजुबाजुला दगड व मातीचे ढिगारे टाकुण रस्ता अडविला होता. त्यामुळे गावकऱ्याचा मागील विस दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी बुधवारी (ता.५) ग्रामसेवकांकडे लेखी निवेदण देउन गावचा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. याच्या बातम्या सर्वत्र प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या शनिवारी (ता८) वतीने तलाठी डिगांबर साबने व ग्रामसेवक अविनाश तोटे यांनी वडखेल येथे जाउन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेउन समजाउन सांगीतले. शेतकऱ्यांनी चुक मान्य करूण तेथील दगड व मातीचे ढिगारे जेसीबीच्या सहाय्याने काढुण घेतले. मागील विस दिवसापासुन बंद असलेला पाणी पुरठा शनिवारी (ता.८) दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आला. यावेळी सरपंच पिंटु देवकते, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत देवकते, गोविंद देवकते, अंगद गंगने, गणेश देवकते, पवनकुमार बोडके व शेतकरी मनोहर देवकते हे उपस्थीत होते.

*सामंजस्यानी प्रश्न सुटला*

गावात कुठलाही वाद न होता पाण्याचा प्रश्न सुटल्याचा आनंद आहे. संबंधित शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व गावकऱ्यांनी सामंजस्यानी प्रश्न सोडविल्याचा खुप आनंद झाला. गावातील सर्वच प्रश्ने असाच पध्दतीने एकोप्याने सोडवावेत.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर (जेष्ठ पत्रकार)

ग्रामस्थ वडखेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या