इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *सिद्धेश्वर इंगोले यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार*

 *सिद्धेश्वर इंगोले यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार*



परळी वै. प्रतिनिधी -: येथील शिवछत्रपती विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांना *कलाविष्कार कला ,क्रीडा व बहु शिक्षणसंस्था,भगोरा जि.अकोला** यांच्यावतीने चित्रकारिता क्षेत्रातील राजरत्न जानराव किर्दक *कलागौरव ** पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कलाविष्कार संस्थेच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार दिले जातात.याही वर्षी 2021 सालच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल यंदाच्या *कलागौरव पुरस्कारासाठी** सिद्धेश्वर इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.पुरस्काराचे वितरण लॉकडाऊन संपल्यानंतर तसेच कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अकोला येथे करण्यात येणार आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी चित्रकार मिलिंद इंगळे यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 सिद्धेश्वर इंगोले यांच्या निवडीबद्दल श्री संत ज्ञानेश प्रतिष्ठानचे सचिव डॉ.प्रतापसिंह शिंदे, शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास शिंदे, शिवाजी उफाडे,सर्व सहकारी शिक्षक तसेच जेष्ठ पत्रकार लेखक रानबा गायकवाड,प्रा.राजकुमार यल्लावाड,प्रा.अरूण पवार, बालाजी कांबळे,मुक्तविहारी,लक्ष्मण लाड,दिवाकर जोशी, विकास वाघमारे,अनंत मुंडे,संजय आघाव आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!