MB NEWS-• *सृजनशीलतेत गौरवशाली: परळीचा आरव गित्ते बनला लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल!* ⬛ *वेबसाईट डिझायनर,अॅप डेव्हलपर व डिव्हिजिब्लिटी प्रमाणपत्राचा ठरला मानकरी*⬛

 • *सृजनशीलतेत गौरवशाली: परळीचा आरव गित्ते बनला लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल!* 



⬛ *वेबसाईट डिझायनर,अॅप डेव्हलपर व डिव्हिजिब्लिटी प्रमाणपत्राचा ठरला मानकरी*⬛



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळी वैजनाथ ही अनेक रत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रात येथील व्यक्तीमत्त्वे आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये परळीतील बालकं ही मागे नाहीत याचा प्रत्यय नुकताच आला असुन परळीतील आरव मधुकर गित्ते याने लिडो लर्निंगमध्ये भारतात अव्वल क्रमांक पटकावला आहे.अॅप/ गेम डेव्हलपर, वेबसाईट डिझायनर व डिव्हिजिब्लिटी अशा तीनही प्रमाणपत्राचा तो मानकरी ठरला आहे. यापुर्वी तो भारतातुन पहिल्या दहा विद्यार्थ्यांत समाविष्ट झाला होता.अल्पावधीतच त्याने प्रथम क्रमांकावर येत उत्तुंग भरारी घेतली आहे.त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



      लिडो लर्निंग ही एक एडटेक स्टार्टअप आहे. ज्यामध्ये तरुण मुलांना कोडिंग शिकवण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रोग्रामिंग शिकण्यास तयार केले जाते आणि त्यानंतर गेम, अ‍ॅनिमेशन आणि अनुप्रयोग (अॅप्स) तयार करण्यास प्रोत्साहित केले जाते. यामध्ये मुलांना स्वत:चे क्रियेशन करुन प्रझेंटेशन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. संपुर्ण भारतातुन ४८० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये परळीतील आरव मधुकर गित्ते याने मोठे यश संपादन केले व प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावलाआहे.एकाचवेळी तीन अॅचिव्हमेंट त्याने मिळवल्या आहेत.बेसिक वेब डिझायनर म्हणून त्याने भारतात अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच प्रमाणे अॅप/ गेम डेव्हलपर व एम्पेर्र आॅफ डिव्हिजिब्लिटी प्रमाणपत्राचा तो मानकरी ठरला आहे. यासाठी त्याला आकाश यादव बेंगलोर, सैजल वार्षणेय मद्रास,आकांशा अत्री,मौन्या रेड्डी हैदराबाद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई प्राचार्या सौ.अर्चना गित्ते, वडील मधुकर गित्ते यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उत्तुंग भरारी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार