युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-आठ.वर्षीय बालिकेने केला रमजान पहिला रोजा

 


आठ.वर्षीय बालिकेने केला रमजान पहिला रोजा



पूर्णा/प्रतिनिधी.......

पूर्णा येथील मस्तानपुरा भागातील आलिया अफजल पठाण या 08.वर्षीय मुलीने पवित्र रमजान महिना सुरू असून पहिला रोजा उपवास धरून देशात चालत असलेल्या कोरोना महामारीचा विनाश व्हावा या संकटातून या व्हायरस चा अंत व्हावा अशी रमजान पहिला रोजा करून नमाज अदा करत अल्ला माझ्या भारत देशातुन व्हायरस चा अंत करा सर्व देश वासीय बांधवास या महामारीतून सुटका व्हावी अशी विनंती करत या 08.वर्षीय मुलीने रोजा उपवास केला आहे.


आलिया अफजल खान पठाण या चिमुकलीने केलेल्या रोजा ने पूर्णा शहरातील नागरिकांनी सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.08 वर्षीय मुलीने देवास सांगाडे घालत देशातील कोरोना महामारीचा सर्वनाश व्हावा सर्व देशातील बांधवास या बिमारीतून सुटका व्हावी म्हणत रोजा उपवास केल्याने सर्व स्तरातुन या चिमुकलीचे कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या