परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दिवस उजाडताच घोर लसिकरणाचा; परळीत लसिकरणासाठी गर्दी-आॅनलाईन,आॅफलाईनच्या घोळात नागरिक ताटकळले
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे.आज दि.११ दिवस उजाडताच लसिकरणाचा घोर नागरिकांना लागल्याचे दिसून आले.सकाळपासुनच लसिकरणासाठी निगरिकांनी केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.आॅनलाईन,आॅफलाईनच्या घोळात नागरिक ताटकळले. लसिकरणासाठी काही सुटसुटीत व्यवस्था लागणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लसिकरणासाठी नागरिकांना सुव्यवस्था देण्याची गरज आहे मात्र प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागातील लोकच संभ्रमात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागरिकांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.सकाळपासुन औष्णिक वीज निर्मिती केंद्र वसाहतीच्या प्रवेशद्वारावर नागरीकांना आठवून नोंदणीची शहानिशा केली जात आहे.ताटकळत रहावे लागत असल्याने नागरीक वैतागून गेले आहेत.याबाबत संबंधित यंत्रणेने सुटसुटीत नियोजन करावे व नागरीकांची कुचंबणा थांबवावी अशी मागणी होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा