MB NEWS-पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार. शेतकऱ्याचे एक लाख विस हजाराचे नुकसान

 पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार



शेतकऱ्याचे एक लाख विस हजाराचे नुकसान


अंबाजोगाई [प्रतिनिधी ]


अंबाजोगाई तालुक्यात दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात पोखरी शिवारात विज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना रविवारी दि.9 घडली. शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथील शेतकरी बंडू कुलकर्णी यांच्याकडे चार बैल आहेत. त्यातील दोण बैल लिंबाच्या झाडाखाली बांधले होते तर दोन बैलावर शेतात मशागत सुरू होती. आचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने कुलकर्णी यांचा गडी कुळवाचे बैल तसेच सोडून गोट्याकडे धावत येत होता. त्यावेळी लिंबाच्या झाडावर विजेचा कडकडाट झाला.विजेच्या कडकडाटात दोन बैल जाग्यावर ठार झाल्याची घटणा रविवारी घडली .बैल ठार झाल्यामुळे शेतकऱ्याचे एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी बंडू कुलकर्णी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !