MB NEWS-परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम* *लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत*

 *परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम*



*लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत*


परळी वैजनाथ - सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या भीषण परिस्थिती मध्ये चौधरी दाम्पत्यांनी स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. प्राध्यापक नितीन चौधरी व डॉक्टर मीना म्हात्रे-चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च टाळत ती रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती विमोचन समिती पुर्व बीड ला देऊ केलेली आहे यामध्ये या समितीतर्फे विविध रुग्णालयात गरजूंना भोजनाची व्यवस्था, मार्गदर्शन केंद्र , लसीकरण जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. 

                           आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य व गरजू लोकांना ICU बेड मिळणे खूप कठीण झाले आहे सातत्याने लोकहीतकारी व लोककल्याणकारी प्रकल्पासाठी पुढाकार घेवून अश्या कठीण प्रसंगी जीवनवायू, प्राणवायू पुरवठा तयार करणाऱ्या ऑक्सिजन concentration मशीन उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत

या मशीनच्याद्वारे हवेतून ऑक्सीजन तयार केला जातो तसेच रूग्ण अत्यावस्थ स्थितीत जाण्यापासून त्यास तात्काळ ऑक्सीजन उपलब्ध होतो .अत्यंत महत्वाची ,महागडी पण हाताळण्यास सोप्या मशीन्स सामान्य व गरजू रुग्णांना मिळाव्यात यासाठी लोकार्पण सोहळा आॅनलाईन पध्दतीने घेवून पुन्हा एकदा एक सेवेचा नवा आदर्श समोर ठेवला आहे. या वेळी मा.प्रा.उत्तम कांदे सर (जिल्हा संघचालक पुर्व बीड), श्री राकेशजी मोरे (प्रांत महाविद्यालय प्रमुख), श्री गोपालजी व्यास (जिल्हा कार्यकर्ता) ईत्यादी उपस्थित होते.

अँड. केशवजी आघाव (तालुका समिती प्रमुख), प्रा. अजय डुबे (सेवा प्रमुख) यांना परळी वैजनाथ तालुका आपत्ती निवारण साठी संपर्क करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार