MB NEWS-आॅनलाईन सिस्टीमचा चकवा: कोविड लसीकरण न होताच मिळालं लस दिल्याचे प्रमाणपत्र ! नागरीकांत संभ्रम: कार्यवाही करा - प्रा पवन मुंडे

 आॅनलाईन सिस्टीमचा चकवा: कोविड लसीकरण न होताच मिळालं लस दिल्याचे प्रमाणपत्र  !



नागरीकांत संभ्रम: कार्यवाही करा - प्रा पवन मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी : 

   परळी येथील सावतामाळी मंदिर परिसरातील खंडोबा मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 मे 2021 रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली,या लसीकरण मोहिमेत आॅनलाईन नोंदणी केलेल्या एका महिलेला लस न मिळताच तिला लसीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे.लसीसाठी लोकांची अगोदरच तारांबळ उडाली असताना आता आपल्याला लस मिळणार नाही यामुळे ही महिला हवालदिल झाली.याबाबत या महिलेने नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली. दरम्यान हा प्रकार आॅनलाईन सिस्टीमचा चकवा असल्याचे आता समोर आले आहे.असा प्रकार अपवादाने घडला तरी नागरीकांनी संभ्रमित होउ नये वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत कळवले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.

        सत्यभामा आत्माराम पांचाळ , वय 59 रा.किर्तीनगर ही महिला खंडोबा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेली असता त्या महिलेची त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने 29 एप्रिल रोजी व्यवस्थित नाव नोंदणी झाली होती व त्यांना वॅक्सिंन मिळणे बाबत 1 मे 2021 ही तारीख देण्यात आली होती. त्यांनी लस घेतली नसताना त्या महिलेला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र 1 मे रोजी दुपारी मेसेजवरून मिळाले.

       असे प्रकार अत्यंत निंदनीय असून वयोवृद्ध लोक लसीच्या डोस साठी तासंनतास रांगेत उभा राहात असून त्यांची लस जर इतर कोणी घेत असेल तर ही बाब गंभीर असून सदरील प्रकारनात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक प्रा मुंडे यांनी केली.याबाबत संबंधितांना चौकशी केली असता हा प्रकार आॅनलाईन सिस्टीमचा चकवा असल्याचे आता समोर आले आहे.असा प्रकार अपवादाने घडला तरी नागरीकांनी संभ्रमित होउ नये. वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत कळवले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !