पोस्ट्स

MB NEWS:दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू*

इमेज
 *⭕ दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू *  -----------------------------------  परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांची माहिती दिली. राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकं भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं. अखेर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. वडेट्टीवार

MB NEWS:*राजकारणात मी चांगल्या गोष्टी करते, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो- पंकजा मुंडे*

इमेज
 *राजकारणात मी चांगल्या गोष्टी करते, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो- पंकजा मुंडे*  माझ्या दारातील गर्दी कधी कमी होवू नये, एवढी शक्ती असावी हिच अपेक्षा* मुंबई दि. ०४ ------ राजकारणात काम करत असतांना मी चांगल्या गोष्टी करते, वाईट करत नाही. कधी कुणाची प्रतारणा केली नाही, दिलेला शब्द प्रसंगी स्वतःचं नुकसान करून पाळलेला आहे पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो. माझ्या राजकीय भूमिकांवर शंका घेणारांनीच याविषयी वेगवेगळ्या शंका निर्माण केल्या. असं करणं म्हणजेच 'अभिमन्यू' करण्यासारखं आहे असं परखड मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एका वृत्त वाहिनीशी मुलाखत देतांना व्यक्त केलं.   सावरगांव येथे झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शिवाजी पार्क भरविण्या विषयी मी जे बोलले ,त्याचा राजकीय अर्थ कुणी काढू नये,हे कुणाला उद्देशून नव्हते. मी चांगलं काम करते, त्याचं कौतुक केलं जात नाही परंतू अफवा पसरवून विनाकारण संभ्रम निर्माण केला जातो, अफवा पसरविण्याचं एक जाळ तयार केल जातयं व यालाच 'अभिमन्यू' करणं असं मी म्ह

MB NEWS:पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!

इमेज
पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन! • _सर्वांनी उपस्थित रहावे- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ • परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आज दि.५ रोजी महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.           विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे.या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्याची महत्वपूर्ण बैठक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या "जगमित्र' संपर्क कार्यालयात  गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित केली असून राष्ट्रवादी काँ

MB NEWS:*शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*

इमेज
 ⭕⭕ *शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड* मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यांनी शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी आज (बुधवार) माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले. अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठा

MB NEWS: 💥💥 *सावध व्हा! राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट*

इमेज
 💥💥 *सावध व्हा! राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट* नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचा खुलासा केला आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अचानक संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणित वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ५९,५४० नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ६ हजार ७२५ नमुने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच जवळपास तब्बल ११.२९ टक्के नमुने करोना संक्रमित आढळले आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रावरचा ताण वाढणार असल्याचं दिसतंय. दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या ६ हजार ७९८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णांलयात भर्ती आहेत. ९७३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३५८ रुग्ण कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसंच २१ हजार ५२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस तपमान कमी होताना दिसतंय. त्यातच सर्दी-खोकल्याच्या आजारासोबतच कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत

MB NEWS:बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
  बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना      •कोरोना उपचारानंतर घरी परतल्यानंतर दुर्देवी निधन •  बीड, प्रतिनिधी....      बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.        कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे शिक्षक असलेले कांबळे या आधी मुंबईला होते. कुख्यात दहशतवादी कसाब आणि दहशतवाद्यांच्या बराकीच्या सुरक्षेची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अल्पावधीतच त्यांनी बीडमध्ये छाप पाडली होती. कारागृहाबाबत सामान्य जनतेची मानसिकता बदलणारा अधिकारी म्हणूनही ते ओळखले जायचे

अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार

इमेज
  अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार परळी वै:- ज्ञानप्रबोधीनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील शाळेचा माजी विद्यार्थी शुभम नितीन शिंदे यांनी योगेश्वरी पॉलिटेक्निक कॉलेज अंबाजोगाई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये 93% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे संस्थापक सचिव परळी भूषण मा.साहेबराव फड साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

MB NEWS:मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या आरोपीला पकडले; तपासात सापडली दुसरी एक चोरीची मोटारसायकल

इमेज
  मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या आरोपीला पकडले; तपासात सापडली दुसरी एक चोरीची मोटारसायकल परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील आरोपीला परळीत वैद्यनाथ काॅलेजसमोर सापळा रचून पकडले तसेच अधिक तपासात दुसरी एक चोरीची मोटारसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात यश मिळवले.ही धडाकेबाज कामगिरी परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव मधुकर हिवराळे रा. तुपदाळ खुर्द ता.मुखेड जी.नांदेड हा इसम चोरीची मोटारसायकल घेऊन परळीतून जात असल्याची गुप्त माहिती परळी पोलिसांना मिळाली.त्या अनुषंगाने परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोह बी.जी.भास्कर, पोना मुंडे,पोना केंद्रे,पोशि बुट्टे,पोशि भताने यांनी शहर हद्दीत तातडीने तपास सुरू केला. वैद्यनाथ काॅलेज समोर सापळा लावला व मोटारसायकल तपासणी केली.यामध्ये वैभव मधुकर हिवराळे रा. तुपदाळ खुर्द ता.मुखेड जी.नांदेड हा आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले.या आरोपींकडून गंगाखेड-परळी रस्त्यावरील एका हाॅटेलसमोरुन चोरी करून आणलेली म

MB NEWS:परळीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

इमेज
  परळीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    शहरातील एका २३ वर्षिय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलीस अधिक तपास करीत आहेत.     याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील हमालवाडी परिसरातील रहिवासी मारोती बालु शिंदे वय २३ या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

MB NEWS:परळीतील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्व व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे भाडे माफ*

इमेज
 * परळीतील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्व व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे भाडे माफ* *व्यावसायिकांनी ना. धनंजय मुंडे व नगर परिषदेचे मानले आभार* परळी (दि. ०३) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी शहरातील जिजामाता फूड प्लाझा मधील सरसकट खाऊ व अन्य विक्रेत्यांचे नगर परिषदेकडून आकारण्यात येणारे सहा महिन्यांचे भाडे कोविड परिस्थितीमुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माफ करण्यात आले आहे.  जिजामाता उद्यान येथील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्वच व्यावसायिकांनी ना. धनंजय मुंडे साहेब, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष श्री. शकील कुरेशी, नगर परिषदेचे गटनेते श्री. वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांसह नगर परिषद प्रशासनाचे दिवाळीच्या तोंडावर थेट सहा महिन्यांचे भाडे माफ करून छोट्या व्यावसायिकांची दिवाळी गोड केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत. शहरातील जिजामाता उद्यान येथील दोन मजली फूड प्लाझा मध्ये आईस्क्रीम, पावभाजी, चायनीज आदी अनेक छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात. कोविड 19 मुळे लागलेल्या लॉकड

MB NEWS:ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन

इमेज
  ओबीसी व्हीजेएनटी  प्रवर्गाच्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन ओबीसी समाजातील संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे.-प्रा. विजय मुंडे ,मा.विलास ताटे* परळी/ प्रतिनिधी ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज दि 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. तहसील कार्यालयासमोर ओबीसी व व्हीजेएनटी संघटनांच्यावतीने महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा .टी.पी. मुंडे  सर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ओबीसी विमुक्त भटक्या जाती व जमाती व विशेष मागास जातीचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत याच प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तहसील कार्यालया समोर व तहसीलदारांमार्फत सरकारला जाग येण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.     8 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यातील सर्व तहसीलदारांना निवेदने देण्यात आलेली आहेत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले असून ते वेगवेगळ्या मार्गाने जोपर्यंत ओबीसी चे सर्व प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर संघटनांच्यावतीने धरणे आंदोल

MB NEWS:धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियोजित आजच्या सर्व बैठका आचारसंहितेमुळे रद्द

इमेज
  धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियोजित आजच्या सर्व बैठका   आचारसंहितेमुळे रद्द    परळी वैजनाथ, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज नियोजित सर्व शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.    आचारसंहिता लागू झाली असल्याने नियोजित सर्व शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

MB NEWS:शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी चा उत्साहात शुभारंभ*

इमेज
 * शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी चा उत्साहात शुभारंभ* *परळी शहरात पाच हजार शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणार-शहर प्रमुख राजेश विभुते* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान परळी शहरात 5000 शिवसेना सदस्य नोंदणी करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी याप्रसंगी सांगितले.  परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता चेंमरी रेस्ट हाऊस येथे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छ. शिवाजी महाराज, हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मा साहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळु क म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम तमाम शिवसैनिकांनी क

MB NEWS:परळी येथे वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा व परळी शहर कडकडीत बंद*

इमेज
  *परळी येथे वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा व परळी शहर कडकडीत बंद* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची करण्यात  आलेली विटंबना व दलित मागासवर्गीय समाजावरील होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी परळीत  आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, महिला ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आज सोमवारी आठवडी बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, प्रवक्ते बबन वडमारे ,धम्मानंद साळवे,युवक नेते ज्ञानेश्वर कवठेकर, वंचित बहुजन आघाडीचे  शहराध्यक्ष  संजय गवळी,  गौतम साळवे, अनिल डोंगरे मिलिंद घाडगे, प्रसन्नजीत रोडे, परमेश्वर लांडगे बाळू किरवले सोनू वाघमारे विकी घाडगे अमोल बनसोडे किरण वाघमारे अनुरथ वीर साहेबराव रोडे,अजर

MB NEWS:पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन

इमेज
  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन बीड,दि. 02 :- (जि.मा.का) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या आढावा बैठकी पुढील प्रमाणे होणार आहेत.    सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कोव्हिड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.00 वाजता सन 2020-21 वर्षाकरिता जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणेबाबत, पाटबंधारे विभागाचा कामकाज आढावा, जलसंधारण विभागाचा कामकाज आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता भूसंपादन- नगर-परळी रेल्वे अतिरिक्त भूसंपादन आढावा, नॅशनल हायवे आढावा, कलम 18 व 28 प्रलंबित भूसंपादन आढावा, विविध विभागांमार्फत भूसंपादन देय मागणी बाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचा आढावा, सन 2018 व त्यापुर्वी पात्र शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा म

MB NEWS-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परळी बंद ची हाक

इमेज
  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परळी बंद ची हाक  बीड (प्रतिनिधी) दि.31 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या विटंबना व महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित समाजावरील वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दि. 02 नोव्हेंबर 2020   परळी बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात, लॉकडाउनच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना माळेगांव जि.नांदेड, बर्दापुर .बीड तसेच येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना जातीवादी मनुवृत्तीच्या नराधमांनी केली आहे. तसेच लॉकडाऊन दलित समाजातील लोकांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाडले आहे.  एकूणच महाविकास आधाड़ी सरकारच्या कार्यकाळात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहजन आधाडी परळी यांच्या वतीने दि.02. नोव्हेबर  रोजी परळी बंदचे अवाहन करण्यात येत जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे राज्याचे मराठवाड्याचे, व जिल्ह्याचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असे शहराध्यक्ष संजय गवळी व गौतम साळवे यांनी कळवले आहेत.

MB NEWS-शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आज प्रारंभ*

इमेज
 * शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आज प्रारंभ* *शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -शहर प्रमुख राजेश विभुते यांचे आवाहन* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मूळूक व उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या प्रमूख उपस्थित व शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेशभैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मोंढा मार्केट येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांतजी खैरे, संपर्कप्रमुख आनंदजी जाधव, जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंभूरे यांच्या सूचनेनुसार व तालुकाप्रमुख व्यंकटेशभैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्य नोंदणीचा प्रारंभ होणार आहे. या कार्

MB NEWS-⭕आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी तर सार्वजनिक बँकेच्या वेळा, व्याजदर बदलणार* -----------------------------------

इमेज
 * ⭕आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी तर सार्वजनिक बँकेच्या वेळा, व्याजदर बदलणार* -----------------------------------   सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल होत आहे. या मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे. तसेच आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. याबाबत काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयानं सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात

MB NEWS-_राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" जास्तीत जास्त लाभ घ्यावा:- शेख मुदस्सिर_*

इमेज
 * _राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" जास्तीत जास्त लाभ घ्यावा:- शेख मुदस्सिर_* *_अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली._*  परळी (प्रतिनिधी) :- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय द्वारा संचालित मौलाना आजाद एजुकेशन फाउंडेशन द्वारे ९वी ते १२वीत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी (विद्यार्थीनी) *"हजरत बेगम महल नॅशनल शिष्यवृत्ती"* दिली जाते.  या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर २०२० होती.  परंतु राज्यातील शैक्षणिक संस्थाने बंद असल्याने व ११ वी ची प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने राज्यातील हजारो विद्यार्थिनींना अर्ज दाखल करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे तारीख पुढे ढकलण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपासून मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयशी सुफियान मनियार बीड यांनी मेल व फोनद्वारे विनंती करून पाठपुरावा करत होते आखिर त्यांची मागणीला यश मिळाले.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली. *राज्यातील अल्पसंख्यांक समा

MB NEWS-स.पोलिस निरीक्षक आरती जाधव यांची औरंगाबाद येथे बदली ;परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभ संपन्न

इमेज
  स.पोलिस निरीक्षक आरती जाधव यांची औरंगाबाद  येथे बदली ;परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभ संपन्न परळी,(प्रतिनिधी):- पोलिस सा.निरीक्षक आरती जाधव मँडम यांची औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बदली  झाली असून  आज दि.31 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप एका देण्यात आला. त्यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.       साहयक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी परळी शहर पोलीस ठाण्याअंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी दामीनी पथकाच्या माध्यमातून आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्या शहर पोलीस ठाण्यात रूजु झाल्यापासून महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता.  महिला वर्गात सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले होते. अतीशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक रोडरोमीओंचा बंदोबस्त त्यांनी केला होता.त्यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  व परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम, न. प. चे कार्यालायीन अधीक्षक संतोष रोडे, इं

MB NEWS:महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

इमेज
  महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी  परळी वैजनाथ दि.31 (प्रतिनिधी) परळी परिसरात महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शनिवारी (ता.31) लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची ३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांनी आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी या दोन्ही महान हस्तींना मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.व्ही.गुट्टे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.       भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांमध्ये खंडित असलेल्या भारताला एकसंध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण करण्याक

MB NEWS:गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी

इमेज
  गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी  प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी साजरी परळी (प्रतिनीधी) प्रभाग क्र.पाच चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले संपर्क कार्यालय हे नागरीकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांनी केले.प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम व शितल चांदण्यात दुध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. संत सावतामाळी मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर समोर प्रभाग क्र.5 चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे काल दि.30 ऑक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकूमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष आय्युब पठाण,माजी सभापती विजय भोयटे,जनक्रांती संघटनेचे नेते सचिन लगड,पञकार धिरज जंगले, अनंत कुलकर्णी,रायुकॉचे रामदास कराड, बळीराम नागरगोजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

MB NEWS:बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

इमेज
  बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली *बापूंच्या आठवणींना मुंडेंनी दिला उजाळा* मुंबई (दि. ३१) ---- : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.  ना. मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशीम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे

MB NEWS:सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

इमेज
  सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई  मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई दि. ३१ ---- २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.   सुरक्षा मंत्रालयांतर्गत कार्यरत सिव्हील स्कूल सोसायटी देशातील निवासी सैनिकी शाळा चालवत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी  काल ट्विट करत ही माहिती दिली ते म्हणाले की,सन २०२१-२२ पासून सैनिक शाळांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाणार आहे. १३ ऑक्टोबरला एक परिपत्रक देशातील सर्व सैनिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. या परिपत्रकात नमूद केले आहे की, सैनिक शाळांमधील ६७ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर ७.५ टक्के जागा अनु

MB NEWS:संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला- पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
  संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला  पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना मुंबई दि. ३१ ----- आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला आहे, त्यांचे विचार व सर्व सामान्य लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरादेवी संस्थानचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब दरवर्षी पोहरादेवीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असत, तीच परंपरा मी पुढे जपली. त्यांचे विचार आणि तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील, त्यांच्या निधनाने देश  एका महान तपस्वीला मुकला आहे अशा शब्दांत आपल्या शोक भावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  ••••