MB NEWS:*शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*

 ⭕⭕

*शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*



मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यांनी शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी आज (बुधवार) माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले.

अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे, असं सांगत न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार