प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

 बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली



*बापूंच्या आठवणींना मुंडेंनी दिला उजाळा*


मुंबई (दि. ३१) ---- : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला. 


ना. मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशीम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे सान्निध्य लाभले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. नुकतेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. 


दरम्यान डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराजांचे बंजारा समाज व्हीजेएनटी आरक्षण लढ्यातील योगदान, त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील तसेच पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या