प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी चा उत्साहात शुभारंभ*

 *शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी चा उत्साहात शुभारंभ*



*परळी शहरात पाच हजार शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणार-शहर प्रमुख राजेश विभुते*


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान परळी शहरात 5000 शिवसेना सदस्य नोंदणी करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी याप्रसंगी सांगितले. 


परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता चेंमरी रेस्ट हाऊस येथे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छ. शिवाजी महाराज, हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मा साहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळु क म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम तमाम शिवसैनिकांनी करावे, बाळासाहेब ठाकरे यांनी 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण केले आहे . राज्यात शिवसेना सत्तेवर असून शिवसेना वाढीसाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन श्री मुळक यांनी केले. पुढे बोलताना श्री सचिन मुळूक म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांतजी खैरे, संपर्कप्रमुख आनंदजी जाधव यांच्या सूचनेवरून संपूर्ण बीड जिल्ह्यासह परळी शहरात मोठ्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे यासाठी तमाम शिवसैनिकांनी हजारो नागरिकांना यात सामावून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे, ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, जिल्हा समन्वयक रमेशआप्पा चौंडे, ज्येष्ठ नेते सतीशअण्णा जगताप, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख विद्याताई गुजर तालुकाप्रमुख विमल ताई गायकवाड शहर प्रमुख सौ सरवदे उपस्थित होते


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांच्यासह उपशहर प्रमुख किसन बुंदेले, मोहन राजमाने, युवा सेना तालुका अधिकारी संतोष चौधरी, शहर अधिकारी कृष्ण सुरवसे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख मोहन परदेशी, तालुकाप्रमुख अमित कचरे, शहरप्रमुख गजानन कोकील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या