MB NEWS:बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

 बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

  


  •कोरोना उपचारानंतर घरी परतल्यानंतर दुर्देवी निधन •

 बीड, प्रतिनिधी....

     बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

       कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे शिक्षक असलेले कांबळे या आधी मुंबईला होते. कुख्यात दहशतवादी कसाब आणि दहशतवाद्यांच्या बराकीच्या सुरक्षेची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अल्पावधीतच त्यांनी बीडमध्ये छाप पाडली होती. कारागृहाबाबत सामान्य जनतेची मानसिकता बदलणारा अधिकारी म्हणूनही ते ओळखले जायचे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !