MB NEWS:संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला- पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

 संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला 

पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना



मुंबई दि. ३१ ----- आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला आहे, त्यांचे विचार व सर्व सामान्य लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 


   समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरादेवी संस्थानचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब दरवर्षी पोहरादेवीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असत, तीच परंपरा मी पुढे जपली. त्यांचे विचार आणि तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील, त्यांच्या निधनाने देश  एका महान तपस्वीला मुकला आहे अशा शब्दांत आपल्या शोक भावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार