MB NEWS:मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या आरोपीला पकडले; तपासात सापडली दुसरी एक चोरीची मोटारसायकल

 मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या आरोपीला पकडले; तपासात सापडली दुसरी एक चोरीची मोटारसायकल



परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      मोटारसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील आरोपीला परळीत वैद्यनाथ काॅलेजसमोर सापळा रचून पकडले तसेच अधिक तपासात दुसरी एक चोरीची मोटारसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात यश मिळवले.ही धडाकेबाज कामगिरी परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव मधुकर हिवराळे रा. तुपदाळ खुर्द ता.मुखेड जी.नांदेड हा इसम चोरीची मोटारसायकल घेऊन परळीतून जात असल्याची गुप्त माहिती परळी पोलिसांना मिळाली.त्या अनुषंगाने परळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोह बी.जी.भास्कर, पोना मुंडे,पोना केंद्रे,पोशि बुट्टे,पोशि भताने यांनी शहर हद्दीत तातडीने तपास सुरू केला. वैद्यनाथ काॅलेज समोर सापळा लावला व मोटारसायकल तपासणी केली.यामध्ये वैभव मधुकर हिवराळे रा. तुपदाळ खुर्द ता.मुखेड जी.नांदेड हा आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले.या आरोपींकडून गंगाखेड-परळी रस्त्यावरील एका हाॅटेलसमोरुन चोरी करून आणलेली मोटारसायकल क्र.एमएच.९ बीएल७८३६ मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी मोटारसायकल चोरी करून एका वीटभट्टीवर लपवल्याचे सांगितले.प्रत्यक्ष स्थळपहाणीत या आरोपीकडून दुसरी एक मोटारसायकल क्र.एम एच १२ एल ई १८९१ ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. या मोटारसायकल चोरीचे गुन्हा दैठणा पोलीस ठाण्यात दाखल आहे.या मोटारसायकल चोर व गाड्यांचा ताबा गंगाखेड पोलीसांना देण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार