MB NEWS:परळी येथे वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा व परळी शहर कडकडीत बंद*

 

*परळी येथे वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा व परळी शहर कडकडीत बंद*



*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची करण्यात  आलेली विटंबना व दलित मागासवर्गीय समाजावरील होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी परळीत  आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 


आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, महिला ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान आज सोमवारी आठवडी बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, प्रवक्ते बबन वडमारे ,धम्मानंद साळवे,युवक नेते ज्ञानेश्वर कवठेकर, वंचित बहुजन आघाडीचे  शहराध्यक्ष  संजय गवळी,  गौतम साळवे, अनिल डोंगरे मिलिंद घाडगे, प्रसन्नजीत रोडे, परमेश्वर लांडगे बाळू किरवले सोनू वाघमारे विकी घाडगे अमोल बनसोडे किरण वाघमारे अनुरथ वीर साहेबराव रोडे,अजर गोरे, ऑल इंडिया पॅंथर सेना आशिष मुंडे, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मोर्चा प्रसंगी तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !