MB NEWS-_राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" जास्तीत जास्त लाभ घ्यावा:- शेख मुदस्सिर_*

 *_राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" जास्तीत जास्त लाभ घ्यावा:- शेख मुदस्सिर_*



*_अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली._*



 परळी (प्रतिनिधी) :- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय द्वारा संचालित मौलाना आजाद एजुकेशन फाउंडेशन द्वारे ९वी ते १२वीत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी (विद्यार्थीनी) *"हजरत बेगम महल नॅशनल शिष्यवृत्ती"* दिली जाते. 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर २०२० होती. 

परंतु राज्यातील शैक्षणिक संस्थाने बंद असल्याने व ११ वी ची प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने राज्यातील हजारो विद्यार्थिनींना अर्ज दाखल करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे तारीख पुढे ढकलण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपासून मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयशी सुफियान मनियार बीड यांनी मेल व फोनद्वारे विनंती करून पाठपुरावा करत होते आखिर त्यांची मागणीला यश मिळाले.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली.

*राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने या शिष्यवृत्ती चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अावाहन शेख मुदस्सिर यांनी केले आहे...*

या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपये तसेच इ. ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख " २८ नोव्हेंबर २०२०" आहे. अर्ज दाखल करण्यासाठी http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा. अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन शेख मुदस्सिर यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार