MB NEWS-⭕आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी तर सार्वजनिक बँकेच्या वेळा, व्याजदर बदलणार* -----------------------------------

 *⭕आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी तर सार्वजनिक बँकेच्या वेळा, व्याजदर बदलणार*



----------------------------------- 

 सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल होत आहे. या मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे

सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे.

तसेच आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. याबाबत काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयानं सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ०.25 टक्क्यांच्या कपातीनंतर आता व्याजदर 3.25 टक्के असणार आहे.

बँक ऑफ बडोदा आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी देखील शुल्क आकारणार आहे. ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. लोन खात्यासाठी तीनपेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास 150 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर बचत खात्यामध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळाच पैसे जमा करता येणार आहे. चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहे. इंडेनने आता बुकिंगसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेन ग्राहकांना आता 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करुन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. तसेच रेल्वे देखील देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात आजपासून बदल करणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !