MB NEWS-स.पोलिस निरीक्षक आरती जाधव यांची औरंगाबाद येथे बदली ;परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभ संपन्न

 स.पोलिस निरीक्षक आरती जाधव यांची औरंगाबाद  येथे बदली ;परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभ संपन्न



परळी,(प्रतिनिधी):- पोलिस सा.निरीक्षक आरती जाधव मँडम यांची औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बदली  झाली असून  आज दि.31 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप एका देण्यात आला. त्यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      साहयक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी परळी शहर पोलीस ठाण्याअंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी दामीनी पथकाच्या माध्यमातून आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्या शहर पोलीस ठाण्यात रूजु झाल्यापासून महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता.  महिला वर्गात सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले होते. अतीशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक रोडरोमीओंचा बंदोबस्त त्यांनी केला होता.त्यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  व परळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम, न. प. चे कार्यालायीन अधीक्षक संतोष रोडे, इंजि.भगवान साकसमुद्रे ,पोलिस समाधान भाजीभकरे आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार