परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी

 गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी 



प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी साजरी

परळी (प्रतिनीधी)

प्रभाग क्र.पाच चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले संपर्क कार्यालय हे नागरीकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांनी केले.प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम व शितल चांदण्यात दुध वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

संत सावतामाळी मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर समोर प्रभाग क्र.5 चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे काल दि.30 ऑक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकूमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष आय्युब पठाण,माजी सभापती विजय भोयटे,जनक्रांती संघटनेचे नेते सचिन लगड,पञकार धिरज जंगले, अनंत कुलकर्णी,रायुकॉचे रामदास कराड, बळीराम नागरगोजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.हे संपर्क कार्यालय या भागातील नागरीकांसाठी हक्काचे ठिकाण झाले असल्याचे शकिल कुरेशी यांनी सांगितले तर नगरसेवक गोपाळ आंधळे हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात या संपर्क कार्यालयामुळे नागरीकांना अनेक योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत मिळणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण,अभयकुमार ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगीतले.प्रभाग क्र.5 च्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजनाचे आयोजन करुन उपस्थित नागरिकांना चंद्राच्या शितल चांदण्यात दुध वाटप करण्यात आले.यावेळी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे, बालाजी दहिफळे, ज्ञानेश्वर होळंबे, भागवत गित्ते, जेष्ठ सामाजिक नेते भाऊशा कदम, जोगदंड मामा, रावसाहेब आंधळे, मोहन साखरे, नन्नू लोखंडे, किशनराव लोखंडे, मुकूंद आंधळे, धनंजय गाडवे, महेश घेवारे यांच्यासह प्रभाग पाच मधील नागरीकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!