MB NEWS:महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

 महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी




 परळी वैजनाथ दि.31 (प्रतिनिधी)


परळी परिसरात महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शनिवारी (ता.31) लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची ३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांनी आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी या दोन्ही महान हस्तींना मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.व्ही.गुट्टे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

      भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांमध्ये खंडित असलेल्या भारताला एकसंध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण करण्याकामी त्यांचे योगदान इतिहासात सदैव अजरामर राहील. बार्डोलीच्या सत्याग्रहात व खेडच्या सत्याग्रहात या लोह पुरुषाचे फार मोठे योगदान होते. अशाप्रकारे सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. बांगलादेशची निर्मिती, पाकिस्तानचा घोर पराभव , भारतापासून खलिस्तान वेगळा करण्याचे मनसुबे ध्वस्त करणे इत्यादी कार्यांमधून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केलेल्या प्रियदर्शिनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यांचा मागोवा याप्रसंगी घेण्यात आला.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी.व्ही. गुट्टे यांनी केले तर प्रा. डॉ. आर. एल. जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. एल. एस.मुंडे प्रा. डॉ. विलास देशपांडे व इतर प्राध्यापक वृंद आणि तसेच शिक्षकेतर कर्मचारीवर्ग इत्यादींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !