MB NEWS-शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आज प्रारंभ*

 *शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आज प्रारंभ*



*शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -शहर प्रमुख राजेश विभुते यांचे आवाहन*


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मूळूक व उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या प्रमूख उपस्थित व शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेशभैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

परळी शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मोंढा मार्केट येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांतजी खैरे, संपर्कप्रमुख आनंदजी जाधव, जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंभूरे यांच्या सूचनेनुसार व तालुकाप्रमुख व्यंकटेशभैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्य नोंदणीचा प्रारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर, ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, जिल्हा समन्वयक रमेशआप्पा चौंडे, ज्येष्ठ नेते सतीशअण्णा जगताप, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख विद्याताई गुजर तालुकाप्रमुख विमल ताई गायकवाड शहर प्रमुख सौ सरवदे या उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभ प्रसंगी परळी शहरातील सर्व शिवसेनाप्रेमी नागरिक तसेच शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांच्यासह उपशहर प्रमुख मोहन राजमाने,कीशन बूंदिले युवा सेना तालुका अधिकारी संतोष चौधरी, शहर अधिकारी कृष्ण सुरवसे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख मोहन परदेशी, तालुकाप्रमुख अमित कचरे, शहरप्रमुख गजानन कोकील यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार