MB NEWS:परळीतील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्व व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे भाडे माफ*

 *परळीतील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्व व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे भाडे माफ*



*व्यावसायिकांनी ना. धनंजय मुंडे व नगर परिषदेचे मानले आभार*


परळी (दि. ०३) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी शहरातील जिजामाता फूड प्लाझा मधील सरसकट खाऊ व अन्य विक्रेत्यांचे नगर परिषदेकडून आकारण्यात येणारे सहा महिन्यांचे भाडे कोविड परिस्थितीमुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माफ करण्यात आले आहे. 


जिजामाता उद्यान येथील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्वच व्यावसायिकांनी ना. धनंजय मुंडे साहेब, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष श्री. शकील कुरेशी, नगर परिषदेचे गटनेते श्री. वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांसह नगर परिषद प्रशासनाचे दिवाळीच्या तोंडावर थेट सहा महिन्यांचे भाडे माफ करून छोट्या व्यावसायिकांची दिवाळी गोड केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.


शहरातील जिजामाता उद्यान येथील दोन मजली फूड प्लाझा मध्ये आईस्क्रीम, पावभाजी, चायनीज आदी अनेक छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात. कोविड 19 मुळे लागलेल्या लॉकडाऊन च्या काळात हे सर्व व्यवसाय बंद राहिल्याने या सर्वच व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी विविध माध्यमातून या व्यावसायिकांना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 


व्यावसायिकांनी नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या भाड्यात सवलत देण्याबाबत सर्व व्यावसायिकांनी ना. मुंडे यांना विनंती करताच त्यांनी फूड प्लाझा मधील सरसकट व्यावसायिकांचे सहा महिन्यांचे भाडे माफ करावेत असे निर्देश नगर परिषदेस दिल्याने व्यावसायिकांनी आपली दिवाळी गोड होणार असल्याची भावना व्यक्त करत ना. धनंजय मुंडे साहेब, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष श्री. शकील कुरेशी, नगर परिषदेचे गटनेते श्री. वाल्मिक अण्णा कराड रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांसह नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार