MB NEWS:सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

 सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण

पंकजाताई  मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत




मुंबई दि. ३१ ---- २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


  सुरक्षा मंत्रालयांतर्गत कार्यरत सिव्हील स्कूल सोसायटी देशातील निवासी सैनिकी शाळा चालवत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी  काल ट्विट करत ही माहिती दिली ते म्हणाले की,सन २०२१-२२ पासून सैनिक शाळांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाणार आहे. १३ ऑक्टोबरला एक परिपत्रक देशातील सर्व सैनिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. या परिपत्रकात नमूद केले आहे की, सैनिक शाळांमधील ६७ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत तर २७ टक्के जागा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. आरक्षण धोरण २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून लागू होईल.


*पंकजाताई मुंडे यांनी केले निर्णयाचे स्वागत* 

-----------------‐-----

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकार अखत्यारीत निवासी सैनिक शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांचे आभार व्यक्त करते. टप्प्याटप्प्याने सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय देखील स्वागतार्ह आहे असे मुंडे यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार